For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेस उमेदवार प्रियांका यांना डॉ.द्वारकानाथांकडून शुभेच्छा

10:09 AM Apr 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेस उमेदवार प्रियांका यांना डॉ द्वारकानाथांकडून शुभेच्छा
Advertisement

बेळगाव : कर्नाटक मागासवर्ग आयोगाचे माजी अध्यक्ष, केपीसीसी कायदा विभागाचे प्रवक्ते डॉ. सी. एस. द्वारकानाथ यांनी चिकोडी लोकसभा मतदारसंघाला भेट देऊन उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना शुभेच्छा दिल्या. चिकोडी येथील कवटगीमठनगर येथील गृह कार्यालयाला भेट देऊन प्रियांका जारकीहोळी यांच्याशी चर्चा केली. मतदारसंघातील राजकीय घडामोडींसह मतदारसंघातून मिळणाऱ्या मतदारांच्या प्रतिक्रिया व प्रतिसाद याबाबत जाणून घेतले. यावेळी डॉ. सी. एस. द्वारकानाथ म्हणाले, मंत्री सतीश जारकीहोळी हे नेहमीच मतदारांच्या संपर्कात असतात. त्यांनी केलेली विकासकामे, समाजातील प्रत्येक घटकांशी ठेवलेले सलोख्याचे संबंध व राजकीय वर्चस्व तसेच राज्य सरकारने राबविलेल्या पाच गॅरंटी योजना यामुळे मतदारसंघात पूरक वातावरण असून विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी साहित्यिक यल्लाप्पा इम्मडी, भटकी जमात महासंघाचे राज्य प्रधान कार्यदर्शी नागराज वकील, संजय लोकापुरे, उदय वाघमारे, रिहाना नदाफ, महादेव पोळ, दयानंद कांबळे आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.