For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिक्षणमंत्री केसरकरांनी दिल्या म. ल. देसाई यांना सेवानिवृत्तीपर शुभेच्छा

05:57 PM Jun 30, 2024 IST | अनुजा कुडतरकर
शिक्षणमंत्री केसरकरांनी दिल्या म  ल  देसाई यांना सेवानिवृत्तीपर शुभेच्छा
Advertisement

ओटवणे प्रतिनिधी
म ल देसाई यांनी शिक्षक व केंद्रप्रमुख या पदावर असताना विविधांगी उपक्रम राबवून मुलांचा सर्वांगीण विकास साधला. तसेच संघटनात्मक भूमिकेतून शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी आवाज उठवत शिक्षकांना न्याय मिळवून दिला. शिक्षक परिवाराच्या समस्या सोडविण्यासह त्यांना मदत करण्यासाठी नेहमीच ते आपल्या संपर्कात असतात. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ासाठी आदर्शवत आणि अभिमान वाटावा असे त्यांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य आहे. त्यांच्या या गुणकौशल्याचा उपयोग संपूर्ण राज्यात होण्यासाठी त्यांना राज्यस्तरीय शिक्षण कमिटीमध्ये स्थान देण्यात येईल.असे सुतोवाच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.कोलगाव आणि मळवाड केंद्रप्रमुख तथा शिक्षक नेते व अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य संयुक्त सरचिटणीस म ल देसाई यांच्या ३५ वर्षाच्या आदर्शवत शैक्षणिक सेवानिवृत्ती निमित्त सावंतवाडीत वेदिका निवास येथे आयोजित करण्यात आलेल्या गौरव सोहळ्यात मंत्री केसरकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी म ल देसाई यांच्या चौफेर कार्याचे कौतुक करीत त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो यासाठी त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी म. ल. देसाई या गौरव सोहळ्यात जिल्हाभरातून विविध क्षेत्रातून आलेल्या शेकडो जणांच्या स्नेह व आपुलकीच्या उपस्थितीने अक्षरशः भारावून गेले. यावेळी त्यांनी आपल्या या शिक्षण क्षेत्रातील कार्यात प्रोत्साहन आणि सहकार्य करणा-या सर्व मंत्री महोदय, अधिकारी वर्ग, राजकीय पदाधीकारी, खांद्याला खांदा लावून साथ देणाऱ्या अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचा प्रत्येक शिलेदार, तमाम शिक्षक आणि आपल्या देसाई परिवाराचे मनापासून आभार मानले. तसेच या प्रवासात अत्यंत कठिण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी यांनी मोलाची साथ दिली त्यांचा आवर्जून उल्लेख करीत आपण सेवानिवृत्त झालो तरी शिक्षक बांधवांसाठी आपण सदैव २४ तास तत्पर असल्याचे सांगितले. तसेच दोडामार्ग तालुका आस्थापनेचा प्रश्न त्वरीत मार्गी लावण्याची विनंती मंत्री केसरकर यांना केली.

Advertisement

Advertisement
Tags :

.