महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

दै.‘ तरुण भारत’वर शुभेच्छांचा वर्षाव

11:56 AM Feb 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वाचक, लेखक, पत्रकार, जाहिरातदार, वृत्तपत्र विक्रेते, शुभचिंतकांकडून प्रशंसोद्गार : खासदार सदानंद तानावडे, आमदार दाजी साळकर, संदेश साधले यांची सदिच्छा भेट

Advertisement

पणजी : आपुलकिचं, जिव्हाळ्याचं वर्तमानपत्र... दैनिक तरुण भारत! अशा शब्दांत तरुण भारतच्या गोवा आवृत्तीच्या 40 व्या वर्धापनदिनानिमित्त गोव्यातील विविध क्षेत्रातील मंडळींनी शुभेच्छांचा वर्षाव केला. राज्यसभा खासदार आणि गोवा प्रदेश भाजपा अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सायंकाळी दैनिक तरुण भारत कार्यालयाला वास्कोचे आमदार दाजी साळकर आणि भाजप मीडिया विभाग प्रमुख संदेश साधले यांच्यासह भेट देऊन तरुण भारत परिवाराला शुभेच्छा दिल्या. दैनिक तरुण भारतच्या 40 व्या वर्धापनदिनानिमित्त गोव्यातील विविध क्षेत्रांतील मंडळींनी टेलिफोनद्वारे तसेच संदेश पाठवून आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे उत्तराखंडला गेले आहेत, मात्र तत्पूर्वी त्यांनी तरुण भारतला आपल्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. सभापती रमेश तवडकर, भाजपचे कोषाध्यक्ष संजीव देसाई, शास्त्रज्ञ व विचारवंत डॉ. नंदकुमार कामत, माजी खासदार नरेंद्र सावईकर, पत्रकार संदेश प्रभूदेसाई, भाजपचे ज्येष्ठ नेते गोविंद पर्वतकर, समाजसेवक डॉ. गुऊदास नाटेकर, पद्मश्री विनायक खेडेकर, अॅड. वल्लभ देसाई, गोवा शिपयार्डचे जनसंपर्क अधिकारी निखिल वाघ, शिक्षणतज्ञ डॉ. अशोक प्रियोळकर, पत्रकार परेश प्रभू, पत्रकार वसंत कातकर, गोवा फॉरवर्डचे दुर्गादास कामत, संत वाङमयाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गोविंद काळे, प्रेमानंद मस्णो नाईक, करियर मार्गदर्शक रामदास केळकर, ज्येष्ठ समाजसेवक विनयकुमार मंत्रवादी, अजित मांद्रेकर, सकाळ समूहाचे सचिन पवार, ज्येष्ठ गायक ऊपेश गावस, माजी जाहिरात व्यवस्थापक सुरेंद्र काकोडकर, गायक प्रेमानंद वेलिंगकर, समाजसेवक रामकृष्ण कामत, गोवा लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष प्रकाश देसाई, ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश तळावडेकर, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर, ज्येष्ठ समाजकार्यकर्ते नीळकंठ भोमकर,  गोमंतक भंडारी समाजाचे उपाध्यक्ष देवानंद नाईक, तृणमूल काँग्रेसचे गोवा निमंत्रक समील वळवईकर, समाजसेवक तथा जी मार्टचे मालक राजेश नाईक, समाजकार्यकर्ते किशोर नार्वेकर, जिल्हा पंचायत सदस्य धाकू मडकईकर अशा अनेक जणांचा समावेश आहे.

Advertisement

रोजचा सूर्योदय अन् तरुण भारत...

रोजचा सूर्योदय व दैनिक तरुण भारतचा अंक हे गेली 40 वर्षे गोवेकरांच्या जीवनाचा भाग बनला आहे. आज तरुण भारतला 40 वर्षे पूर्ण होत आहेत. यापुढेही हा प्रवास असाच चालत राहो, अशा तरुण भारत परिवाराला शुभेच्छा!

- अॅड. नरेंद्र सावईकर

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article