For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

श्रीजेश, सविता यांना सर्वोत्तम खेळाडूचे नामांकन

06:24 AM Mar 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
श्रीजेश  सविता यांना सर्वोत्तम खेळाडूचे नामांकन

इंडियाकडून पुरस्कारांसाठी नामांकन मिळालेल्या खेळाडूंची यादी जाहीर

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

हॉकी इंडियाने वार्षिक पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या हॉकीपटूंची यादी जाहीर केली असून गोलरक्षक पीआर श्रीजेश व सविता पुनिया यांना पुरुष व महिला विभागात वर्षातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. 31 मार्च रोजी पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

Advertisement

श्रीजेश हा माजी कर्णधार असून तो व सविता पुनिया यांनी भारतातर्फे सातत्यपूर्ण प्रदर्शन केले आहे. त्यांना सर्वोत्तम गोलरक्षकाच्या पुरस्कारासाठीही नामांकन मिळाले आहे. भारताच्या पुरुष संघाचा कर्णधार व डिफेंडर हरमनप्रीत सिंग याचेही दोन पुरस्कारांसाठी नामांकन झाले आहे. वर्षातील सर्वोत्तम खेळाडू व सर्वोत्तम डिफेंडर पुरस्काराच्या यादीत त्याचे नाव आहे. या दोन्ही पुरस्कारासाठी प्रत्येकी 25 लाखाचे तर गोलरक्षकाला 5 लाखाचे बक्षीस मिळणार आहे. विविध आठ विभागासाठी 32 जणांना नामांकन मिळाले असून एकूण 7.56 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे, असे हॉकी इंडियाने सांगितले.

Advertisement

‘मेजर ध्यान चंद जीवनगौरव या सर्वोच्च पुरस्कारविजेत्याला सर्वाधिक 30 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. हॉकीसाठी भरीव योगदान दिलेल्या खेळाडूची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते,’ असेही हॉकी इंडियाने म्हटले आहे. वर्षातील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडूचा जुगराज सिंग पुरस्कार व असुंता लाक्रा पुरस्कार (महिलांसाठी) 21 वर्षाखालील खेळाडूंना दिला जातो. त्यांना प्रत्येकी 10 लाख रुपये दिले जातात. सर्वोत्तम डिफेंडरसाठी परगतसिंग पुरस्कार, सर्वोत्तम मिडफिल्डरसाठी अजित पाल सिंग पुरस्कार, सर्वोत्तम फॉरवर्डसाठी धनंजय पिल्ले पुरस्कार विजेत्या खेळाडूंना 5 लाख रुपये दिले जाणार आहेत.

पुरस्कारांसाठी खेळाडूंची निवड करणे खूपच आव्हानात्मक होते. कारण अलीकडे पुरुष व महिलां विभागातील खेळाडूंनी असामान्य प्रदर्शन करून दाखवले आहे., असे हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की म्हणाले. खेळाडूंची समर्पण वृत्ती, त्यांची गुणवत्ता आणि खेळाडू, प्रशिक्षक, पंच, पदाधिकारी यांचे खेळाबद्दलचे प्रेम आणि पॅशन हेच या पुरस्कारांतून प्रतिबिंबित होते, असे सरचिटणीस भोला नाथ सिंग म्हणाले.

विविध पुरस्कारांसाठी नामांकन मिळालेल्या खेळाडूंत मोहित एसएच, कृशन बहादूर पाठक, दीप ग्रेस एक्का, अमित रोहिदास, उदिता, सलिमा टेटे, हार्दिक सिंग, मनप्रीत सिंग, नवनीत कौर, वंदना कटारिया, अभिषेक, सुखजीत सिंग, मनदीप सिंग, वैष्णवी विठ्ठल फाळके, दीपिका, दीपिका सोरेंग, सुनेलिता टोपो, उत्तम सिंग, अमिर अली, विष्णुकांत सिंग, अरायजित सिंग हुंडाल यांचा समावेश आहे

Advertisement
Tags :
×

.