दाणोली साटम महाराज वाचनालयाला उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार वितरण
दुकानवाड प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रंथालयांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने येत्या महिन्याभरात कॅबिनेट मंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांच्या समवेत जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली जाईल. या बैठकीत निश्चितपणे ग्रंथालय कर्मचारी तसेच ग्रंथालयांच्या विकासासंदर्भात चर्चा केली जाईल. शासनाच्या माध्यमातून सर्व प्रश्न सोडवले जातील अशी बाही जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि भाजपचे नेते तथा जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी दिली. माणगाव येथे जिल्हा ग्रंथालय संघ व श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालय माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा ग्रंथालयाचे वार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. यावेळी दाणोली येथील साटम महाराज ग्रंथालयाला जिल्हा ग्रंथालय संघाचे उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार वितरण करण्यात आले. या अधिवेशनाला जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के, वासुदेवानंद सरस्वती वाचनालय अध्यक्ष सौ स्नेहा फणसळकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे, सरपंच मनीषा भोसले, सगुण धुरी, अरविंद शिरसाट , जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव राजन पांचाळ, सहकार्यवाह विठ्ठल कदम, महेश बोवलेकर , अनंत वैद्य, भरत गावडे, ॲड.संतोष सावंत, ऋतुजा केळकर, रूजारियो पिंटो, गुरुनाथ मडवळ, जयेंद्र तळेकर, संजय वेतुरेकर, नंदन वेंगुर्लेकर, प्रवीण भोगटे, सतीश गावडे, प्रसाद दळवी, विजय केसरकर, शरद कोरगावकर, विजय पालकर, मेघशाम पावसकर, सदाशिव पाटील, एकनाथ केसरकर, प्रज्ञा कविटकर, अजित आडेकर, आत्माराम राऊळ, अणावकर आदी उपस्थित होते.