For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडीच्या युवराज-युवराज्ञी यांना सर्वोत्कृष्ट हेरिटेज पाककृती पुरस्कार

11:54 AM Dec 14, 2024 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडीच्या युवराज युवराज्ञी यांना सर्वोत्कृष्ट हेरिटेज पाककृती पुरस्कार
Advertisement

ट्रॅव्हल प्लस लीझर यांचा भारतातील सर्वोत्कृष्ट अवॉर्ड

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

ट्रॅव्हल प्लस लीझर यांचा भारतातील सर्वोत्कृष्ट हेरिटेज पाककृती चॅम्पियन २०२४ हा अवॉर्ड सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले व युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांना प्रदान करण्यात आला. दिल्ली येथे हा सोहळा संपन्न झाला. पाककलेचा हा परंपरागत वारसा यापुढेही जपणार असल्याचे प्रतिपादन युवराज, युवराज्ञींनी सत्कार स्वीकारताना केले.

Advertisement

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सावंतवाडी संस्थानमध्ये आजही परंपरागत चालत आलेल्या पाककृती जपल्या जात आहेत. राजेशाही मेजवानीतील हे पदार्थ आजही येथे बनविले जातात. युवराज लखमराजे भोंसले व युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी ऐतिहासिक राजवाडा येथे 'सावंतवाडी पॅलेस द बुटिक आर्ट हॉटेल' सुरू केलं आहे. या ठिकाणी ऐतिहासिक वारसा, परंपरा जपत असताना खाद्य संस्कृतीतील वारसा देखील त्यांनी कायम ठेवला आहे. देशी- विदेशी पर्यटकांना येथे राजेशाही पारंपरिक खाद्यपदार्थ येथे चाखण्याची संधी मिळते. ट्रॅव्हल प्लस लीझर या संस्थेने यांची दखल घेऊन भारतातील सर्वोत्कृष्ट हेरिटेज पाककृती चॅम्पियन २०२४ हा अवॉर्ड त्यांना प्रदान केला. युवराज व युवराज्ञी हे स्वतः उत्कृष्ट दर्जाचे शेफ आहेत. दिल्ली येथे त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पाककलेचा हा परंपरागत वारसा यापुढेही जपणार असल्याचे प्रतिपादन युवराज, युवराज्ञींनी करत सन्मानासाठी आभार व्यक्त केले.

Advertisement
Tags :

.