आकाशातील बर्म्युडा
ट्रायंगलचा वाढतोय आकार येथे तुकडे तुकडे होतात उपग्रह
पृथ्वीच्या इनर स्पेसमध्ये दक्षिण अटलांटिकच्या वर एक असा पॉइंट आहे, ज्याच्या नजीक जातात कुठलाही उपग्रह नष्ट होऊन जातो. येथे पृथ्वीची चुंबकीय ढाल कमकुवत ठरते, यामुळे उपग्रह निष्क्रीय होतात. हे दक्षिण अटलांटिक एनोमली (विसंगती) पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात एक कमजोर बिंदू असून तो उपग्रह तंत्रज्ञानात अडथळे निर्माण करतो आणि मोठ्या बिघाडाचे कारण ठरतो. अशाप्रकारच्या घटना वेगाने वाढत असल्याचे वैज्ञानिकांना आढळून आले अहे. 2014 पासून याचे क्षेत्रफळ युरोप खंडाच्या निम्म्या आकाराइतके झाले आहे. चकित करणाऱ्या संशोधनाने आमच्या ग्रहाच्या सुरक्षा कवचात सातत्याने वाढणाऱ्या रिक्तपणाला उघड केले आहे आणि हे उपग्रहांना तुकडे-तुकडे करत आहे.
दक्षिण अटलांटिक विसंगतीचा (एसएए) शोध सर्वप्रथम 1800 च्या दशकात झाला होता, आजही हे अराजकतेचा स्रोत ठरले आहे. मार्च 2016 मध्ये जपानची हितोमी (एस्ट्रो-एच) एक्स-रे वेधशाळा अनियंत्रित स्वरुपात फिरल्याने नष्ट झाली होती. यामुळे जवळपास 273 दशलक्ष डॉलर्सचे नुकसान झाले. एका दशकानंतरही एसएए अंतराळात वस्ती निर्माण करण्याच्या प्रयत्नांमध्ये अडथळे आणत आहे, एसएए आमच्या ग्रहाच्या मॅग्नेटिक शील्डमध्ये एक कमकुवत कडी ठरले आहे. एसएएमुळे उपग्रहीय प्रणालींना नुकसान पोहोचते आणि गंभीर बिघाड निर्माण होऊ शकतो. आमच्या ग्रहाचे मॅग्नेटिक फील्ड आमच्यासाठी आणि पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक जीवासाठी आवश्यक आहे, कारण हे आम्हाला ब्रह्मांडीय विकिरण आणि सूर्याकडून येणाऱ्या विद्युत आवेशित कणांपासून वाचविते.
वाढत चाललाय आकार
युरोपीय अंतराळ संस्थेच्या (ईएसए) स्वार्म सॅटेलाइट नेटवर्ककडून प्राप्त 10 वर्षांहून अधिक चुंबकीय डाटाचा वापर करत संशोधकांना या घटना वाढत असल्याचे आढळून आले. 2014 पासून या क्षेत्राचे क्षेत्रफळ वाढून जवळपास युरोपच्या निम्म्याइतके झाले आहे. आमच्या पृथ्वीचा मॅग्नेटिक फील्ड वितळणाऱ्या लोखंडापासून निर्माण झाले आहे, जे पृष्ठभागापासून जवळपास 3000 किलोमीटर खाली पृथ्वीच्या बाहेरील कोरच्या स्वरुपात कार्य करते. हे वितळलेले लोह विद्युत प्रवाह उत्पन्न करते, जे बदल्यात एक इलेक्ट्रो मॅग्नेटिक फील्डची निर्मिती करते. ईएसएच्या स्वार्ममध्ये एकसारखे उपग्रह सामील आहेत, जे पृथ्वीच्या चुंबकीय संकेतांचे मापन करतात, एसएएच्या विस्तारासोबत आफ्रिकेच्या दक्षिण-पश्चिमेत अटलांटिक महासागराच्या एका क्षेत्रात 2020 पासून पृथ्वीच्या मॅग्नेटिक फील्डमध्ये आणखी वेगाने कमजोरी दिसून आल्याचा खुलासा स्वार्म मिशनने केला आहे. दक्षिण अटलांटिक एनोमलाय केवळ एक पॉइंट नाही, हे आफ्रिकेच्या दिशेने दक्षिण अमेरिकेच्या नजीकच्या तुलनेत वेगळ्या प्रकारे बदलत आहे. या क्षेत्रात काही विशेष घडत असून यामुळे हे क्षेत्र अधिक वेगाने कमजोर होत असल्याचे अध्ययनाचे प्रमुख लेखक क्रिस फिनले यांनी सांगितले आडहे.
परत कोरमध्ये जातेय मॅग्नेटिक फील्ड
साधारणपणे दक्षिण हेमीस्फीयरमध्ये कोरमधून निघणाऱ्या मॅग्नेटिक फील्ड रेखांना पाहण्याची अपेक्षा आम्ही करतो. परंतु दक्षिण अटलांटिक एनामलोय (एसएए) च्य ाखाली आम्हाला अनपेक्षित भाग दिसून येतात, जेथे मॅग्नेटिक फील्ड, कोरमधून बाहेर येण्याऐवजी कोरमध्ये परत जाते. स्वार्म डाटामुळे यातील एक क्षेत्र आफ्रिकेच्य ावर पश्चिमेच्या दिशेने सरकत असून ते या क्षेत्रात एसएए कमोजर होण्यात योगदान देत असल्याचे आपण पाहू शकतो.