For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेनकनहळ्ळी, गणेशपूर श्री महालक्ष्मी यात्रा 23 एप्रिलपासून

06:05 AM Mar 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेनकनहळ्ळी  गणेशपूर  श्री महालक्ष्मी यात्रा 23 एप्रिलपासून
Advertisement

9 दिवस उत्सव, रथजोडणी, मंडप उभारणीचा मुहूर्तमेढ उत्साहात

Advertisement

हिंडलगा/वार्ताहर

बेनकनहळ्ळी व गणेशपूर गावची श्री महालक्ष्मी यात्रा तब्बल 33 वर्षानंतर मंगळवार दि. 23 एप्रिलपासून आयोजित करण्यात आली आहे. सदर यात्रा 9 दिवसांची होणार असून, नुकतीच श्री महालक्ष्मी यात्रेच्या मंडपाचा मुहुर्तमेढ व रथजोडणी कार्यक्रम देणगीदार, महालक्ष्मी यात्रा कमिटी, ग्रामस्थ पंचकमिटी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला.

Advertisement

बेनकनहळ्ळी व गणेशपूर परिसरात श्री महालक्ष्मी यात्रा भव्य प्रमाणात साजरी करण्याच्या उद्देशाने श्री महालक्ष्मी यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्यावतीने जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच यात्रेसाठी लागणाऱ्या रथाची गणेशपूरसह बेनकनहळ्ळी गावामध्ये भंडाऱ्याची उधळण करत भव्य मिरवणूक काढण्यात आली. तर यात्रा भरणाऱ्या गदगेच्या ठिकाणी भव्य मंडप उभारून भाविकांची दर्शनासाठी सोय करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त यात्रेला येणाऱ्या भाविकांना पाणी, रस्ते व इतर प्रकारच्या गैरसुविधा निर्माण होऊ नयेत, यादृष्टीने देखील पंचकमिटी ज्येष्ठ नागरिकांचे सल्ले घेऊन कार्यरत आहे. तर ग्रामपंचायत व ग्रामस्थांनीदेखील आपापल्या परीने यात्रेच्या तयारीसाठी कंबर कसली आहे

Advertisement
Tags :

.