For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सायबर गुन्हेगारीत बेंगळूर पहिल्या क्रमांकावर

01:28 PM Oct 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
सायबर गुन्हेगारीत बेंगळूर पहिल्या क्रमांकावर
Advertisement

देशात दररोज सुमारे 7 हजार सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी दाखल : 2021 पासून संख्येत लक्षणीयरित्या वाढ

Advertisement

बेंगळूर : देशातील प्रमुख शहरांच्या तुलनेत सायबर गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये बेंगळूर पहिल्या क्रमांकावर आहे. ही चिंतेची बाब आहे. देशात दररोज सुमारे 7,000 सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी दाखल केल्या जात आहेत. 2021 पासून ही संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. यापैकी सुमारे 85 टक्के सायबर तक्रारी ऑनलाईन आर्थिक फसवणुकीशी संबंधित आहेत. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या माहितीनुसार, भारतातील 19 प्रमुख शहरांमध्ये सायबर गुन्ह्यांच्या संख्येत 39 टक्क्मयांनी वाढ झाली आहे. या 19 शहरांमधील एकूण सायबर गुन्ह्यांपैकी निम्मी प्रकरणे बेंगळूरमध्ये घडत आहेत. गुंतवणूक घोटाळे, गेमिंग अॅप्स, बेकायदेशीर कर्ज देणारे अॅप्स आणि ओटीपी घोटाळे हे देखील या प्रकरणांमध्ये आहेत. 2024 च्या पहिल्या चार महिन्यांत सायबर गुन्हेगारांनी लोकांकडून 1,750 कोटी ऊपयांहून अधिक रक्कम लुटली आहे.

2024 मध्ये गुन्हेगारांचा 22,842 कोटी ऊपयांवर डल्ला 

Advertisement

2024 मध्ये भारतात सायबर गुन्हेगार आणि फसवणूक करणाऱ्यांनी 22,842 कोटी रुपयांवर डल्ला मारला आहे, असे डेटालिड्सने देशातील व्यापक डिजिटल फसवणुकीवरील अहवालात म्हटले आहे. यावषी भारतीयांना 1.2 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम गमावावी लागेल, असा अंदाज राज्य आणि केंद्रीय कायदा अंमलबजावणी संस्थांमध्ये संपर्क साधणारी संघीय संस्था असलेल्या इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरने वर्तविला आहे.

गमवणारी रक्कम 10 पटीने वाढली

2022 मध्ये सायबर गुन्हेगारांनी 2,306 कोटी ऊपये लुटले होते. 2023 मध्ये हे प्रमाण वाढून 7,465 कोटी ऊपये झाले. ही सुमारे 3 पट वाढ आहे. 2024 पर्यंत ती 10 पट वाढली आहे. म्हणजेच सायबर फसवणुकीमुळे लोक वर्षानुवर्षे वाढत असलेल्या दराने पैसे गमावत आहेत. सायबर गुन्ह्यांच्या तक्रारिंची संख्याही अशीच वाढली आहे. 2024 मध्ये सुमारे 20 लाख प्रकरणे नोंदवली गेली आहेत. मागील वषी ही संख्या सुमारे 15.6 लाख असून 2019 मध्ये नोंदवलेल्या प्रकरणांपेक्षा दहा पट जास्त आहे. भारतातील डिजिटल गुन्हेगार हुशार आणि अधिक प्रभावी होत आहेत. सुमारे 290 लाख बेरोजगार असलेल्या देशात त्यांची संख्या वाढत आहे.

तीन वर्षांत प्रकरणांत मोठी वाढ

गेल्या तीन वर्षांत भारतात सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. डिजिटल पेमेंट पद्धती हे याचे मुख्य कारण आहे. पेटीएम, फोनपेसारख्या पेमेंट सेवा आणि

व्हॉट्सअॅप, टेलिग्रामसारख्या मेसेजिंग 

प्लॅटफॉर्मद्वारे ऑनलाईन आर्थिक तपशील शेअर केल्याने सायबर गुन्हेगारांना गुन्हे करणे सोपे झाले आहे. आकडेवारीनुसार, जून 2025 मध्येच 190 लाखांहून अधिक यूपीआय किंवा युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस व्यवहार झाले. या सर्वांचे एकूण मूल्य 24.03 लाख कोटी ऊपये आहे. डिजिटल पेमेंटचे मूल्य 2013 मध्ये अंदाजे 162 कोटी रुपयांवरून जानेवारी 2025 मध्ये 18,120.82 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. जगभरातील अशा सर्व पेमेंटपैकी जवळजवळ निम्मे भारताचे आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे.

Advertisement
Tags :

.