पोलिसांच्या माहितीनुसार, नवाझ आणि नंदिनी हे पूर्वी शाळेत एकत्र शिकले होते. ते दोघे तीन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. मिळालेल्या माहितीनुसार, नंदिनीने दुसऱ्या कोणाशी तरी लग्न केल्यामुळे नवाझ तिच्यावर नाराज होता.
Bangluru Crime लग्नाला नकार मिळताच त्याने तिच्यावर केला चाकू हल्ला, १८ वर्षीय विक्षिप्त प्रियकराचं कृत्य
प्रेयसीने लग्नाला नकार देताच तिच्या घरी घुसून चाकूने वार केल्याची घटना बंगळूरु येथे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील रामागोंडहळ्ळी परिसरात राहणाऱ्या १८ वर्षीय नवाझचे कथित प्रेयसी नंदिनीसोबत प्रेमसंबंध होते. नवाझने नंदिनीला लग्नासाठी विचारताच तिने दिलेल्या नकारानंतर रागाच्या भरात तिच्यावर हल्ला केला.
आपल्या प्रेयसीने दिलेल्या नकारानंतर नवाझ तिच्या घरी गेला आणि तिच्या मानेवर, हातांवर आणि मांडीवर चाकूने अनेक वार केले. या हल्ल्यानंतर नवाझने स्वतःचे जीवन संपवण्याचाही प्रयत्न केला.
१८ वर्षीय नवाझचे धक्कादायक कृत्य
घटनेच्या वेळी नंदीनीचे आईवडील घरी नव्हते. पोलिसांनी सांगितले की, नवाझने हॉलमध्ये तिच्यावर हल्ला करण्यापूर्वी तिच्या दोन लहान भावांना एका खोलीत कोंडून ठेवले होते.नवाझने हल्ला केल्यानंतर जखमी झालेल्या नंदिनीने मदतीसाठी शेजाऱ्यांना बोलवण्यास सुरुवात केली. आरडाओरडा ऐकून शेजारी नंदिनीच्या मदतीला आले आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी नंदिनी आणि नवाझ यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल केले.
मिळालेल्या माहितीनुसार पिडीत नंदिनी बंगरुळूच्या मनिपाल रुग्णालयात दाखल असून संशयित आरोपी नवाझ याला वैदेही रुग्णालयात दाखल केले.