For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बंगालच्या राज्यपालांवर लैंगिक छळाचा आरोप

06:27 AM May 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
बंगालच्या राज्यपालांवर लैंगिक छळाचा आरोप
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांच्याविरोधात कोलकाता येथे लैंगिक छळाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. 2 मे रोजी सायंकाळी 5 वाजता राज्यपालांविऊद्ध विनयभंगाची तक्रार प्राप्त झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. मात्र, अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला. याचदरम्यान, राज्यपाल बोस यांनी आरोप फेटाळून लावत आपल्याला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. ‘सत्याचा विजय होईल, मी कथित आरोपांना  घाबरत नाही. माझी बदनामी करून कोणाला निवडणूक फायदा हवा असेल तर देव त्यांचे भले करो. पण बंगालमधील भ्रष्टाचार आणि हिंसाचाराच्या विरोधातील माझा लढा ते थांबवू शकत नाहीत’ असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यपालांवर गंभीर आरोप झाले असले तरी घटनेतील कलम 361 मधील तरतुदीमुळे पोलीस संशयित म्हणून राज्यपालांचे नाव घेऊ शकत नाहीत किंवा प्रकरणाचा तपास करू शकत नाहीत. कलम 361 राष्ट्रपती आणि राज्यपालांना त्यांच्या पदावर असताना त्यांच्या कृतींसाठी न्यायालयात जबाबदार धरण्यापासून सूट देते. याचा अर्थ असा की त्यांच्या कर्तव्याचा भाग म्हणून त्यांनी केलेल्या कोणत्याही गोष्टीसाठी त्यांच्यावर खटला चालवला जाऊ शकत नाही.

Advertisement

Advertisement
Tags :

.