महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

लोककल्प-युनियन बँकेतर्फे कुसमळी शाळेसाठी बाक भेट

10:45 AM Jun 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : लोकमान्य सोसायटी संचालित लोककल्प फाऊंडेशन व युनियन बँक ऑफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील कुसमळी गावातील शाळेसाठी बाक देण्यात आले. याप्रसंगी रिजनल मॅनेजर एम. एन. कुलकर्णी, असिस्टंट जनरल मॅनेजर आरती रुरनियार, रिजनल ऑफीसचे चिफ मॅनेजर आनंद कांबळे, नागराज पाटील, आरपीडी कॉलेज रोडवरील बँकेच्या शाखेचे व्यवस्थापक प्रवीण कदम उपस्थित होते. युनियन बँकेने ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधा देण्यावर भर दिला असून त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी आरती रुरनियार यांनी बँकेप्रति  सामाजिक बांधिलकी व्यक्त केली. लोककल्प फाऊंडेशनने लोकमान्य सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक बांधिलकी म्हणून खानापूर तालुक्यातील 30 गावे दत्तक घेतली आहेत. फाऊंडेशनच्या पुढाकाराने या गावांमध्ये शिक्षण, आरोग्य तसेच सामाजिक सेवा देण्यात येत आहे. युनियन बँकेने कुसमळी येथील शाळेसाठी बाक देऊन मोठी मदत केल्याने लोककल्पतर्फे बँकेने धन्यवाद देण्यात आले. याप्रसंगी शाळा सुधारणा समिती सदस्य, ग्रा. पं. सदस्य तसेच लोककल्पच्या सीएसआर मॅनेजर मालिनी बाली, सूरजसिंग राजपूत, स्वयंसेवक संतोष कदम, अनंत गावडे आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article