लाडक्या बहीणीचे पैसे वाढणार, शेतकऱ्यांना भरघोस मदत
आता आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत पण भाजप नेते अमित शहा यांचे मोठे विधान
मुंबई :
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने रविवारी आपला जाहीरनामाम प्रसिद्ध केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थित भाजपने हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी देवेंद्र फडणवीस, विनोद तावड, देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. दरम्यान भाजपच्या संकल्पनाम्यातून प्रामुख्याने महिला, विद्यार्थी, शेतकरी, मध्यमवर्गीय नागरिकांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्यात आहे. आज 10 नोव्हेंबरच्या दिवशीच छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला पराभूत केले होते त्याच शिवशक्तिच्या प्रेरणेने काम करणारे नेते हा अर्थसंकल्प सादर करत आहेत असे म्हणत भाजपकडून या पत्रकार परिषदेची सुरूवात करण्यात आली होती.
भाजपच्या जाहीरनाम्यातील महत्वाचे मुद्दे
-लाडक्या बहिणींना 2100 रुपये
-शेतकऱ्यांसाठी भावान्तर योजना
-शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार
-प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवाऱ्याचा हक्क
-वृद्धांची पेन्शन 2100 रुपये
-जीवनावश्यक वस्तुंचे भाव स्थिर ठेवणार
-25 लाख रोजगारांची निर्मिती
-10 लाख विद्यार्थ्यांना वेतन
-गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी सौरचा वापर करुन 30 टक्के कमी करणार
-विज्ञान तंत्रज्ञान : मेक इन महाराष्ट्राला प्रभावीपणे राबवणार
-महाराष्ट्राला फिनटेक आणि एआयचं केंद्र करू
-एअरोनॉटिकल आणि स्पेसमध्ये उत्पादनावर काम करू
-अक्षय अन्न योजना आणणार
-महारथी : एआय लॅब्स
-कौशल्य जनगणना करणार
-छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र
-हमी भावापेक्षा कमी भावात खरेदी करत असेल तर भावात्तम रक्कम शेतक्रयांच्या खात्यात
-अडीच वर्षांमध्ये 1 लाखापेक्षा जास्त सरकारी नोक्रया दिल्या.
10 वर्षांत मोठी कामे : अतिम शहा
भाजप सरकारने मागच्या दहा वर्षात मोठी कामं केली असं सांगताना अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंसह शरद पवार आणि काँग्रेसवरही निशाणा साधला. तुम्ही केलेल्या कामांचा हिशोब तुम्ही जनतेसमोर ठेवा. आघाडी सरकारच्या काळात जनतेला खूप त्रास सहन करावा लागला असं अमित शाहा म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील जलयुक्त शिवारच्या कामांचंही कौतुक केले.
आता आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, पण : शहांचे सूचक वक्तव्य
‘आता आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, पण निवडणुकीनंतर बैठक घेऊन याबाबत विचार विनिमय केला जाईल, असे मोठे विधान भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. रविवारी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी जनतेला संबोधीत करताना शहा यांनी महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे भाष्य केले. भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर शाहांनी शरद पवारांवर टीका केली. शहा म्हणाले, यावेळी आम्ही मुख्यमंत्र्याची निवड करण्यात शरद पवारांना संधी देणार नाही. शरद पवारांना खोट्या गोष्टी सांगण्याची आवड आहे. पण यावेळी त्यांच्या रणनीतीला यश येणार नसल्याचे शहा म्हणाले.