बेल्जियमवर वारा चोरल्याचा आरोप
शेजारी देशाकडून आरोप
गाडी, गुरं, सोने-चांदी आणि अन्य मूल्यवान सामग्री चोरीला जात असते, बँक आणि म्युझियममधून दुर्लभ गोष्टी चोरीला जाण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत, परंतु आता चोरीचे एक असे प्रकरण समोर आले आहे, ज्यात वारा चोरल्याचा आरोप केला जात आहे आणि तो देखील दोन देशांच्या स्तरांवर. आतापर्यंत पाणी आणि अनेक नैसर्गिक संपदा चोरण्याचे आरोप एक देश दुसऱ्या देशावर करत राहिले आहेत. नेदरलँडच्या एका हवामान संबंधी कंपनीच्या अधिकाऱ्याने बेल्जियमवर वारा चोरल्याचा आरोप केला आहे. बेल्जियमच्या एका ब्रॉडकास्टर सर्व्हिससोबत एका मुलाखतीत या अधिकाऱ्याने बेल्जियमचे लोक आमच्या देशाचा वारा चोरत असल्याचे म्हटले आहे.
परस्परांचे शेजारी
बेल्जियम आणि नेदरलँड हे परस्परांचे शेजारी देश असून दोघांदरम्यान भूसीमा देखील आहे. अशा स्थितीत या दोन्ही देशांच्या सीमावर्ती भागांमध्ये अशा अनेक घडामोडी घडत आहेत, ज्यामुळे दोन्ही देश प्रभावित होतात. आता अशाच एका डच वेदर फोरकास्टर सर्व्हिस फर्मचे सीईओ रेम्को वर्जिल्बर्ग यांनी बेल्जियमवर त्यांच्या देशाचा वारा चोरल्याचा आरोप केला आहे.
पवन ऊर्जा कंपनी चोरत आहेत वारा
बेल्जियमच्या पवन ऊर्जा फर्म उत्तर सागरात नेदरलँडच्या पवन फार्मांमधून पवन ऊर्जा चोरी करत आहेत. उत्तर सागरमये बेल्जियमच्या पवन चक्क्यांना त्यांच्या स्थानामुळे डच लोकांच्या तुलनेत एक फायदा आहे, ते प्रभावी स्वरुपात डच पवन ऊर्जेची चोरी करत असल्याचे वर्जिल्बर्ग यांनी म्हटले आहे.
मोठमोठे टर्बाइन खेचत आहेत वारा
वर्जिल्बर्ग यांच्यानुसार पवन टर्बाइनला हवेतून वारा मिळविण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. जर पवन टर्बाइनच्या मागे वारा कमी वेगाने वाहतो, अनेक पवन टर्बाइन असलेल्या पवन फार्मामागे प्रत्यक्षात वाऱ्याचा कमी वेग दिसून येतो. बेल्जियमच्या पवन फार्म डच फार्मांच्या तुलनेत अधिक लाभदायक आहेत, ते डच पार्कांच्या दक्षिण-पश्चिम दिशेला असल्याने ते अनेकदा आमचा वारा चोरतात, म्हणजेच बेल्जियमच्या विशाल आकारची टर्बाइन्स बेल्जियमचा वारा खेचून घेत असल्याचे वर्जिल्बर्ग यांनी सांगितले आहे.
नेदरलँडचा 3 टक्क्यांपर्यंतच्या वारा चोरीला
बेल्जियमच्या पवन फार्म डच कंपन्यांच्या 3 टक्क्यांपर्यंतच्या पवन ऊर्जेला स्वत:कडे खेचून घेत आहेत. पवन टर्बाइनमागे मोजण्यात आलेल्या वाऱ्याचा वेग कमी आहे. ही घटना पवन टर्बाइन्सच्या स्थानांमुळे पूर्णपणे आकस्मिक आहे. नजीकच्या भविष्यात दोन्ही देशांदरम्यान चांगल्या समन्वयाची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अधिक पवनचक्क्यांमुळे वाढणार चोरी
अशाप्रकारची पवन चोरी एक मोठा मुद्दा ठरणार आहे, कारण कार्बन तटस्थ होण्याच्या आंतरराष्ट्रीय शर्यतीत उत्तर सागरात अधिक पवन फार्म स्थापन केल्या जात आहेत. याचमुळे तेथे पवन ऊर्जेची चोरी अधिक होणार आहे. याप्रकरणी संघर्ष टाळण्यासाठी उत्तम योजना आणि समन्वयाची गरज असल्याचे डच हवामान पूर्वानुमान तज्ञाने म्हटले आहे. कार्बन तटस्थ होण्याचे लक्ष्य बाळगलेल्या देशांसाठी पवन फार्मांचा वापर महत्त्वपूर्ण आहे. 2030 पर्यंत बेल्जियम स्वत:च्या लक्ष्यांना पूर्ण करण्यासाठी उत्तर सागरमध्ये 6 गीगावॅटची पवन टर्बाइन निर्माण करू इच्छितो.