For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगावकरांची आजवर वकिलांनाच पसंती

10:52 AM Apr 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगावकरांची आजवर वकिलांनाच पसंती
Advertisement

स्वत:ही वकील असल्याने विजयी करण्याचे जगदीश शेट्टरांचे आवाहन

Advertisement

बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व अधिकाधिक वकिलांनीच केले आहे. पहिले खासदार बळवंतराव दातार, शिवानंद कौजलगी, अमरसिंह पाटील, एस. बी. सिदनाळ, सुरेश अंगडी हे खासदार वकील पेशातूनच राजकारणात उतरले होते. त्यामुळे बेळगावची ही परंपरा खंडित होऊ न देता वकिलांनी भाजपला मतदान करून माजी मुख्यमंत्री अॅड. जगदीश शेट्टर यांनाच खासदार करा, असे आवाहन जगदीश शेट्टर यांनी केले. शुक्रवारी बेळगाव बार असोसिएशनच्या अॅड. डी. बी. दीक्षित सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. वकील पेशात असल्याने वकिलांच्या समस्या अत्यंत जवळून पाहिल्या आहेत. विधानसभेत अनेक वेळा वकिलांच्या समस्यांवर आवाज उठवून न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळे आता हा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवायचा असल्यास भाजपला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी भाजपचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अनिल बेनके, बार असोसिएशनचे उपाध्यक्ष विजय पाटील, अॅड. एम. बी. जिरली, आर. एस. मुतालिक यासह इतर उपस्थित होते.

शेट्टरना लोकसभेत पाठवा

Advertisement

मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या कारभारात एकही भ्रष्टाचार झालेला नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी व भ्रष्टाचार मुक्त कारभारासाठी जगदीश शेट्टर यांना लोकसभेत पाठवावे. शेट्टर यांना 40 वर्षांचा राजकीय अनुभव असून बेळगाव लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी प्रभारी म्हणून काम केले आहे. बेळगाव बार असोसिएशन ही एक शिस्तबद्ध संघटना असून त्यांनी भाजपच्या पाठीशी रहावे, असे अॅड. अनिल बेनके यांनी सांगितले.

बसव कॉलनी येथे चाय पे चर्चा

बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील बसव कॉलनी, शाहूनगर या परिसरात जगदीश शेट्टर यांनी प्रचारदौरा राबविला. नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्यासोबत चाय पे चर्चा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडण्यासाठी भारतीय जनता पक्षालाच मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

Advertisement
Tags :

.