मिनी ऑलिम्पिक खो-खो स्पर्धेत बेळगाव विजेता
खो-खोत परंपरा बेळगावने राखली, श्रेयस भातकांडे उत्कृष्ट खेळ
बेळगाव : बेंगळूर येथील कर्नाटक मिनी ऑलिम्पिक संघटना आयोजित राज्यस्तरीय जिल्हा अंतरजिल्हा 14 वर्षाखालील खो-खो स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने म्हैसूर संघाचा 1 गडी व 5 मिनिटे राखून विजय मिळवित मिनी ऑलिम्पिक चषक पटकाविला. श्रेयस भातकांडे याने उत्तम खेळाचे प्रदर्शन घडविले. बेंगळूर येथील मिनी ऑलिम्पिक 14 वर्षाखालील खो-खो स्पर्धेत बेळगाव जिल्हा संघाने हावेरी संघाचा 1 डाव व 2 गुणांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात बेंगळूरच 4 गडी व 1 डावाने विजयी मिळविला. तिसऱ्या सामन्यात राणेबेन्नूर संघाचा 3 गुण व 1 डावाने पराभव करीत उपांत्यफेरीत प्रवेश केला. उपांत्यफेरीच्या सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने बागलकोट जिल्हा संघाचा 5 गुण व 1 डावाने पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली.
उपांत्यफेरीच्या सामान्यात रनिंग करतेवेळी बेळगावच्या सोहम भातकांडे व राज भातकांडे याने उत्तम खेळाचे प्रदर्शन दाखविल्याने संघाला अंतिम फेरीत धडक मारण्यास यांचा सिंहाचा वाटा होता. अंतिम सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने म्हैसूर जिल्हा संघाचा 1 गडी व 5 मिनिटे राखून विजय मिळवित चषक पटकाविला. या अंतिम सामन्यात रनिंग करतेवेळी सोहम भातकांडे याने उत्तम खेळाचे प्रदर्शन घडवित संघाला विजय मिळवून देण्यास मोलाचे योगदान दिले. या संघाला प्रदीप भादुंर्गे व अरविंद मन्नोळकर, एन. आर. पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. या विजयी संघात सोहम भातकांडे, संकल्प सांबरेकर, श्रेयस भातकांडे, ओंमकार पाटील, कौशिक भातकांटे, वैभव गोरे, श्रीनिवास कटांबळे यांनी या स्पर्धेत अप्रतिम खेळाचे प्रदर्शन घडविले.