For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव वॉरियर्स,मॅक्स क्लब विजयी

10:12 AM May 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव वॉरियर्स मॅक्स क्लब विजयी
Advertisement

राजू दोड्डण्णावर चषक क्रिकेट स्पर्धा

Advertisement

बेळगाव : आनंद क्रिकेट अकदामी आयोजित राजू दोड्डण्णावर चषक 13 वर्षाखाली आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेच्या शेवटच्या साखळी सामन्यात बेळगाव वॉरियर्स संघाने लेक व्ह्यू संघाचा 7 गड्यांनी तर मॅक्स क्रिकेट क्लबने दळळी टेंडर्सचा 9 गड्यांनी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. प्रितम रेड्डी व श्लोक चढीचाल यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. भगवान महावीर मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात लेक व्ह्यू संघाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 8 गडी बाद 95 धावा केल्या. त्यात आराध्य तुडवेकरने 2 चौकारासह 19, आयुष यु. ने 2 चौकारासह 11 धावा केल्या. बेळगाव वॉरियर्सतर्फे श्लोक चडीचालने 10 धावात 3, अल्तमशने 11 धावात 2, आरूषने 19 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव वॉरियर्सने 17.1 षटकात 3 गडी बाद 96 धावा करून सामना 7 गड्यांनी जिंकला. त्यात श्लोक चडीचालने 5 चौकारासह 37, वोजस गडकरीने 2 चौकारासह 14 धावा केल्या. लेक व्ह्यूतर्फे आयूष 1 गडी बाद केला. दुसऱ्या समान्यात दळवी ट्रेडर्सने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात सर्व गडी बाद 90 धावा केल्या. त्यात महम्मद जियान सलीमवालेने 2 चौकारासह 15 धावा केल्या. मॅक्सतर्फे प्रितम रेड्डीने 9 धावात 3 गडी बाद केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना मॅक्स क्रिकेट क्लबने 17 षटकात 1 गडी बाद 91 धावा करून सामना 9 गड्यांनी जिंकला त्यात श्रवण पाटीलने 2 चौकारासह 34, अवनी 2 चौकारास 20 धावा केल्या. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे मेहबुब सनदी, विनायक पाटील यांच्या हस्ते सामनावीर श्लोक चडीचाल तर कल्लाप्पा आनंदाचे, विनायक कोलारी यांच्याहस्ते सामनावीर प्रितम रेड्डी यांना चषक देऊन गौरविण्यात आले.

Advertisement
Advertisement
Tags :

.