For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव 26 जुलै रोजी कारगिल विजयोत्सवाचे आयोजन

07:22 AM Jul 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव 26 जुलै रोजी कारगिल विजयोत्सवाचे आयोजन
Advertisement

अखिल कर्नाटक माजी सैनिक संघाकडून माहिती

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव

Advertisement

अखिल कर्नाटक माजी सैनिक संघाच्यावतीने 26 जुलै रोजी नेहरुनगर येथील केपीटीसीएल सभागृहात 27 वा कारगिल आणि ऑपरेशन सिंदूर विजयोत्सव साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी सैनिक संघाच्यावतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.

या संबंधीची माहिती देण्यासाठी बुधवारी अखिल कर्नाटक माजी सैनिक संघाच्यावतीने कन्नड साहित्य भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना अध्यक्ष बसाप्पा तळवार म्हणाले की, या सोहळ्यात हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबांचा आणि निवृत्त जवानांचा गौरव केला जाणार आहे. अंध आणि अनाथ मुलांना प्रोत्साहनपर आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच कारगिल युद्धातील हुतात्मा सैनिकांच्या वारसांना, माजी सैनिकांना जनरल करिअप्पा व सैनिकरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.

सदर सोहळ्याचे उद्घाटन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते केले जाणार असून माजी मंत्री आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी, लष्करी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. वीर जवानांच्या स्मरणासाठी नागरिकांनी व तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन यावेळी संघाच्यावतीने करण्यात आले. यावेळी डॉ. शिवाण्णा एस., के. एन. कळसन्नावर, शंकर हर्जे, अडिकेप्पा मणगुत्ती, आशाराणी वण्णूर यांच्यासह पदाधिकारी व माजी सैनिक उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.