महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बेळगाव स्पोर्ट्स क्लबकडे हलगेकर चषक

10:05 AM Jun 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सुरेंद्र पाटील मालिकावीर, लक्ष्य खातायत सामनावीर

Advertisement

बेळगाव : खानापूर येथील महालक्ष्मी शिक्षण संस्था व शांतिनिकेतन पब्लीक स्कूल महाविद्यालय आयोजित आमदार विठ्ठल हलगेकर चषक 16 वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लबने युनियन जिमखाना संघाचा 7 धावांनी पराभव करून विठ्ठल हलगेकर चषक पटकाविला. सुरेंद्र पाटील मालिकावीर तर लक्ष्य खातायतला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. खानापूर येथील शांतिनिकेतन स्कूलच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लबने महालक्ष्मी स्पोर्ट्स खानापूरचा 29 धावांनी तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात युनियन जिमखानाने रॉजर क्रिकेट क्लबचा 27 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश  केला.

Advertisement

अंतिम सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लबने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 3 गडी बाद 77 धावा केल्या. त्यात लक्ष्य खातायतने 5 चौकारासह 36 तर सुरेंद्र पाटीलने 2 चौकारासह 13 धावा केला. जिमखानातर्फे गौरव, वीर व स्वरूप यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनियन जिमखानाने 10 षटकात 4 गडी बाद 70 धावाच केल्या. त्यात स्वरूप साळुंखेने 4 चौकारास 31 तर लक्ष्य खातायत व साईराज यांनी 2 चौकारांसह प्रत्येकी 10 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे सुमीत व लक्ष्य खातायत यांनी प्रत्येकी 2 तर आयुषने 1 गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या बेळगाव स्पोर्ट्स क्लब व उपविजेत्या युनियन जिमखाना संघाला चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या संघात सोहम पाटील, सुरेंद्र पाटील, जयशांत सुब्रम्हण्यम, श्रेयस बस्तवाडकर, केदारी संभाजीचे, लक्ष्य खातायत, प्रज्वोत उघाडे, मयुर जाधव, साहील पाटील, संतोष महाजन, सिद्धार्थ रायकर, आयुष सरदेसाई, फैजान धामणेकर आदी खेळाडूंचा समावेश आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article