बेळगाव स्पोर्ट्स क्लब, सिग्नीचर विजयी
बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यता प्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए थर्ड डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत सो वारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून बेळगाव स्पोर्ट्स क्रिकेट सी संघाने विजया क्रिकेट अकादमीचा 8 गड्यांनी तर सिग्नीचर क्रिकेट स्पोर्ट्स क्लबने रॉजर्स क्रिकेट संघाचा 91 धावांनी पराभव करुन प्रत्येकी 4 गुण मिळविले. अनुराग पाटील तर आर्यन गवळी यांना सामनावीर पुरस्कार बेळगाव येथील केएससीए मैदानावरती खेळविण्यात आलेल्या सामन्यात सिग्नीचर स्पोर्ट्स क्लबने प्रथम फलंदाजी करताना 30 षटकात 6 गडी बाद 257 धावा केल्या. अनुराग पाटीलने 71, श्रेयेस काळसेकर 47, अमोर यल्लुप्पाचे 63, मनोज पाटीलने 37 धावा केल्या. रॉजर्सतर्फे आशिष मंडोळकरने 2, सुनील व अभिषेक यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना रॉजर्सतर्फे 27.1 षटकात सर्वगडी बाद 176 धावा जमविल्या.
विनित पाटीलने 32, सुमित बेळगुंदीने 21, सुनील पाटीलने 17, अभिषेक मंडळोकर व अशोक बाणीने प्रत्येकी 15 तर अभिषेक पम्मारने 28 धावा केल्या. सिग्नीचरतर्फे अमोल यल्लुप्पाचे, मनोज पाटील, अनुराग पाटील यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात विजया क्रिकेट अकादमीतर्फे प्रथम फलंदाजी करताना 23.4 षटकात सर्वगडी बाद 97 धावा केल्या. त्यात राघुवीर सिंग रजपूतने 21, चंदन कुंदरनाड 20, लक्ष्य शहाने 17 तर नमन ओऊळकरने 15 धावा केल्या. बेळगावतर्फे शुभम एस. 3 तर गणेश मुतगेकरने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव स्पोर्ट्स क्लब सी संघाने 14.4 षटकात 2 गडी बाद 102 धावा करुन सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात आर्यन गवळी नाबाद 62, कृष्णा सुतार व प्रवीण करडे यांनी प्रत्येकी 15 धावा केल्या. विजयातर्फे लक्ष्य शहा व चंदर कुंदरनाड यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.