कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेळगाव स्पोर्ट्स क्लब,जिमखाना विजयी

10:26 AM Oct 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

संजीवनी चषक क्रिकेट स्पर्धा

Advertisement

बेळगाव : प्रमोद पालेकर क्रिकेट अकादमी आयोजित संजिवनी फाउंडेशन चषक 11 वर्षाखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून युनियन जिमखाना संघाने के. आर. शेट्टीचा, तर बीएससीने रॉजर क्रिकेट क्लबचा पराभव करून प्रत्येकी दोन गुण मिळवले. सलमान धारवाडकर व तऊण मिठी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. व्हॅक्सीन डेपो मैदानावरती सुरू असलेल्या या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या सामन्यात के. आर. शेट्टी संघाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 7 गडी बाद 140 धावा केल्या. हर्ष पाटीलने 11 चौकारासह 58, शौर्य पाटीलने तीन चौकारासह 31 धावा केल्या. जिमखानातर्फे संग्राम पाटीलने 26 धावा तीन, शौर्य पाटीलने 21 धावा 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनियन जिमखाना संघाने 24 षटकात 7 गडी बाद 146 धावा करून सामना तीन गड्यानी जिंकला.

Advertisement

सलमान धारवाडकरने 1 षटकार 4 चौकारासह 33, शाहऊख मुरारीने पाच चौकारासह 31 धावा केल्या. के. आर. शेट्टीतर्फे संचिता नाईकने 15 धावात दोन तर आदर्श व अंगद पाटील यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. दुसऱ्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लबने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात पाच गडी बाद 148 धावा केल्या. त्यात शिवांशु होनगलने पाच चौकारासह 38, ध्रुवने तीन चौकारांसह 32 धावा केल्या. रॉजरतर्फे तरूण मिठीने 18 धावा दोन तर चिन्मय, जोहान, ध्रुव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना रॉजर क्रिकेट क्लबने 25 षटकात 9 गडी बाद 127 धावा केला. त्यात साई पाटीलने चार चौकारासह 27 तर अध्याय मोदगेकरने 18 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे शिवम पवारने 12 धावांत 2, साई पाटील, कुशल कांबळे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article