For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव स्पोर्ट्स क्लबचा मोठा विजय

10:37 AM Jan 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव स्पोर्ट्स क्लबचा मोठा विजय
Advertisement

केएससीए फस्ट डिव्हीजन क्रिकेट स्पर्धा

Advertisement

बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यता प्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित धारवाड फस्ट डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लबने तेजल शिरगुप्पी क्रिकेट अकादमी अ हुबळीचा 187 धावांनी पराभव करून 4 गुण मिळविले. शतकवीर सुजय सातेरी याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.ऑटोनगर येथील केएससीए मैदानावरती खेळविण्यात आलेल्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लबने प्रथम फलंदाजी करताना 49.2 षटकांत सर्वगडी बाद 367 धावांचा डोंगर उभा केला. सुजय सातेरीने 6 षटकार, 21 चौकारांसह 115 चेंडूत 173 धावा करीत दमदार दीडशतक झळकविले. त्याला ओमकार वेर्णेकरने  2 षटकार, 4 चौकारांसह 47, आशुतोष हिरेमठने 5 चौकारांसह 36,

केदार उसुलकरने 1 षटकार, 5 चौकारांसह 34, सुदीप सातेरीने 5 चौकारांसह 30 तर पार्थ पाटीलने 1 षटकार, 3 चौकारांसह 26 धावा केल्या. तेजल शिरगुप्पीतर्फे  प्रल्हाद नाईकने 50 धावांत 4, वैभव व्ही. के. ने 23 धावांत 2 तर गणेश नाईक, शुभम जी., ए. आर. समित व अनिलगौडा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना तेजल शिरगुप्पी संघाचा डाव 31.5 षटकांत 180 धावात आटोपला. प्रल्हाद नाईकने 7 चौकारांसह 65, ध्रुव वासूने 3 षटकार, 5 चौकारांसह 51, ए. आर. समितने 2 चौकारांसह 17, गणेश नाईकने 2 चौकारांसह 14 तर वैभव व्ही. के. ने 13 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे तनिष्क नाईकने 23 धावांत 3, पार्थ पाटीलने 38 धावांत 3 तर किरण बोकडे, सिद्धेश असलकर, प्रतीक कुऱ्हाडे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

Advertisement

Advertisement
Tags :

.