राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटर्सची चमक
बेळगाव : मोहाली चंदिगड येथे रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित दुसऱ्या खुल्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत बेळगावच्या स्केटींगपटू हिरेन राज व देवन बामणे चमक दाखविली. या चॅम्पियनशिपमध्ये बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटर सहभागी झाले होते. या स्पर्धा मोहाली चंदिगड येथे पार पडल्या या स्पर्धेतमध्ये 28 राज्यातील 1400 स्केटर्स सहभागी झाले होते. बेळगावच्या स्केटर्सनी 1 रौप्य व 2 कांस्य पदके जिंकली. फ्री स्टाईल स्केटिंग मध्ये हिरेन राज 1 रौप्य, 1 कांस्य तर देवेन बामणे 1 रौप्य पटकाविले. स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, मंजुनाथ मंडोळकर योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, विठ्ठल गगणे आणि विश्वनाथ यांच्या मार्गदर्शन लाभले. डॉ प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडोलकर, इंदुधर एस. सरचिटणीस केआरएसए यांचे प्रोत्साहन मिळाले.