For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रोलर स्केटिंगमध्ये बेळगावच्या स्केटर्सची चमक

08:43 AM Jun 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
रोलर स्केटिंगमध्ये बेळगावच्या स्केटर्सची चमक
Advertisement

बेळगाव : तुमकुर आणि बेंगलोर येथे कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित खुल्या राज्यस्तरीय रोलर स्केटिंग  स्पर्धेत बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटर्सनी बेळगांव संघाने 9 सुवर्ण 6 सिलव्हर 2 कांस्य पदक पटकावित घवघवीत यश संपादन केले. तुमकुर आणि बेंगलोर येथे राज्यस्तरीय  रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत मध्ये सुमारें 8 जिल्हातून 300 च्या वर खेळाडूंनी भाग घेतला होता.  फ्री स्टाईल स्केटिंग पदक विजेता अथर्व हडपड 1 रौप्य, हिरेन राजने 2 सुवर्ण, दृष्टी अंकलने 1 रौप्य, 1 कांस्य, अवनीश कोरीशेट्टीने 1 सुवर्ण, 1 रौप्य, रश्मिता अंबिगाने 2 सुवर्ण, जयध्यान एस राजने 2 सुवर्ण, देवेन बामणने 1 सुवर्ण, 1 रौप्य पदक पटकाविले. अल्पाइन आणि डाउनहिल स्केटिंग पदक विजेता-साईराज मेंडकेने 1 सुवर्ण, 1 रौप्य, आरटीस्टिक स्केटिंग पदक विजेता-खुशी आगशीमणाने 1 रौप्य, 1 कांस्य मिळविले. त्याना स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा आणि विश्वनाथ येलुरकर, यांच्या मार्गदर्शन लाभले. तर केएलई स्केटिंग रिंक , गुड शेफर्ड स्केटिंग रिंक आणि शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे सराव करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.