बेळगाव-सिकंदराबाद एक्स्प्रेस अखेर मार्गस्थ
मंत्रालयला जाणाऱ्या भाविकांची सोय
बेळगाव : बेळगाव-सिकंदराबाद-मनगुरू एक्स्प्रेस बुधवारपासून पूर्ववत झाली. 3 ते 4 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ही एक्स्प्रेस पूर्ववत सुरू झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. या एक्स्प्रेसमुळे आता हैदराबाद-सिकंदराबाद या शहरांसह मंत्रालय येथील मंदिराला ये-जा करणे सोयीचे होणार आहे. तांत्रिक कारणाने बेळगाव-मनगुरू एक्स्प्रेस मागील तीन ते चार महिन्यांपासून बंद होती. राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी वारंवार पाठपुरावा करत एक्स्प्रेस पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. मागील आठवड्यात रेल्वेने ही एक्स्प्रेस पूर्ववत करण्यास परवानगी दिली. त्यानुसार आता आठवड्यातून चार दिवस बेळगाव-मनगुरू एक्स्प्रेस धावणार आहे. यामुळे बेळगावच्या वाट्याला आणखी एक एक्स्प्रेस उपलब्ध झाली आहे. बेळगावच्या प्रवाशांनी एक्स्प्रेसचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन नैर्त्रुत्य रेल्वेने केले आहे.