महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बेळगावात ‘शिवाजी’ दी बॉस : साईराज चषक फुटबॉल स्पर्धा : अंतिम लढतीत शिवाजी मंडळाचा पाटाकडीलवर विजय

04:53 PM Nov 27, 2023 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

एक लाख ऊपये व पाच फुटी चषकाच्या बक्षीसाने गौरव : उपविजेत्या पाटाकडीलचाही 50 हजार ऊपयांच्या बक्षीसाने सन्मान, शिवाजी मंडळाच्या एक हजारावर समर्थकांनी केला मोठा जल्लोष; उपविजेत्या पाटाकडील तालीम मंडळालाही 50 हजार ऊपये व चषक असे बक्षीस देऊन गौरवले

कोल्हापूर प्रतिनिधी

Advertisement

बेळगावातील लेले ग्राऊंडवर तब्बल पाच हजाराहून अधिक फुटबॉलप्रेमींच्या उपस्थितीत रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या शिवाजी तरूण मंडळाने कोल्हापूरच्याच पाटाकडील तालीम मंडळाचा सडनडेथमध्ये पराभव करत साईराज चषक-2023 फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले. पूर्ण वेळेत सामना गोलशुन्य बरोबरीत सुटल्याने टायब्रेकरचा अवलंब केला होता. पण टायब्रेकरही 4-4 गोलबरोबरीत सुटल्याने सामन्याच्या विजयासह स्पर्धेचे अजिंक्यपदावर कब्जा कोणाचा याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी सडनडेथ अवलंबला. यात शिवाजी मंडळाच्या संकेत साळोखेने मारलेल्या पेनल्टीमधून पाटाकडीलवर गोल झाला. पाटाकडीलकडून ओंकार मोरेने पेनाल्टी मात्र गोलरक्षक मयुरेश चौगुले अडवून शिवाजी मंडळाला साईराज चषकही मिळवून दिला.

Advertisement

साईराज स्पोर्टस् क्लबने या स्पर्धेचे आयोजन केले होते. दरम्यान, सकाळी शिवाजी तरूण मंडळ व इंफिनिटी क्लब यांच्यात पहिला उपांत्य सामना झाला. सामन्यावर शिवाजी तरूण मंडळाने वर्चस्व सिद्ध करत गोव्यातील इंफिनिटी क्लबला दबावाखाली ठेवले होते. तसेच मिळेल त्या संधीचा फायदा उठवत संकेत साळोखे पुर्वार्धात दोन गोल तर उत्तरार्धात संकेत विठ्ठल साळोखेने तिसरा गोल केला. अखेर याच 3 गोलच्या जोरावर शिवाजी मंडळाने सामना जिंकून अंतिम फेरीत मुसंडी मारली होती. सामन्यात इंफिनिटी क्लबनेही चालींचा मारा करत गोलसाठी मारलेले 3 चेंडू गोलरक्षक मयुरेश चौगुलेने अडवून शिवाजी मंडळाला सुरक्षीत ठेवले.

पाटाकडील तालीम मंडळ व दिलबहार तालीम मंडळ यांच्यात दुसरा उपांत्य सामना झाला. चुरशी खेळल्या गेलेल्या या सामन्याच्या पुर्वार्धात ओंकार मोरेने दिलबहारवर गोल कऊन पाटाकडीलला आघाडी मिळवून दिली होती. हीच आघाडी सामन्याची निर्धारीत 60 मिनिटांची वेळ संपेपर्यंत कायम होती. मात्र जादाच्या वेळेत दिलबहारच्या पवन माळीने पाटाकडीलवर गोल कऊन सामना 1-1 गोलबरोबरीत आणला. उर्वरीत वेळेत निर्णायक गोल झाल्याने सामना 1-1 बरोबरीत सुटला. त्यामुळे सामना विजयाचा फैसला करण्यासाठी टायब्रेकर अवलंबला. यात पाटाकडीलने दिलबहारला 3-1 गोलफरकाने मात देत अंतिम फेरीत उडी घेतली होती. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात मान्यवरांच्या हस्ते स्पर्धा विजेत्या शिवाजी तरूण मंडळाला 1 लाख ऊपये व साडे पाच फुटी साईराज चषक असे बक्षीस देऊन गौरवले. उपविजेत्या पाटाकडीललाही 50 हजार रूपये व चषक असे बक्षीस देऊन सन्मानित केले.

उत्कृष्ट फॉरवर्ड : संकेत साळोखे-गोपी (शिवाजी तरूण मंडळ)

उत्कृष्ट हाफ : संकेत विठ्ठल साळोखे (शिवाजी तरूण मंडळ)

शिवाजी मंडळाचा मयुरेश चौगुले मालिकावीर
संपूर्ण स्पर्धेत शिवाजी तऊण मंडळाचा गोलरक्षक मयुरेश चौगुलेने उत्कृष्ट गोलरक्षण कऊन शिवाजी मंडळाला पराभवापासून दुर ठेवले. या कामगिरीची दखल घेऊन स्पर्धा आयोजकांनी त्याला मालिकावीर म्हणून निवडले. तसेच त्याच्या खेळाचा सन्मान म्हणून दुचाकी गाडीही बक्षीस दिली. फोटो 26 संग्राम फोल्डरमध्ये मयुरेश चौगुले या नावाने

शिवाजी मंडळाच्या समर्थकांची लक्षवेधी उपस्थिती...
शिवाजी तरूण मंडळच साईराज चषक जिंकणार ही अपेक्षा घेऊन मंडळाचे हजारावर समर्थक बेळगावातील लेले ग्राऊंडवर दाखल झाले होते. अंतिम सामन्यात पाटाकडीलला मात देऊन शिवाजी मंडळाने साईराज चषकावर कब्जा करताच उपस्थित समर्थकांनी एकच जल्लोष करत अख्खे लेले ग्राऊंड डोक्यावर घेतले.

 

Advertisement
Tags :
belgaumptmPTM final matchSairaj Cup Football TournamentShivaji Mandalvictory over PTM
Next Article