For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव मित्रमंडळ पिंपरी-चिंचवड-पुणेतर्फे महापौरांचा सत्कार

10:45 AM Feb 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव मित्रमंडळ पिंपरी चिंचवड पुणेतर्फे महापौरांचा सत्कार
Advertisement

बेळगाव : बेळगाव मित्र मंडळ पिंपरी-चिंचवड-पुणेतर्फे बेळगावच्या महापौर शोभा सोमनाचे यांचा निळू फुले रंगमंदिर पुणे येथे सत्कार करण्यात आला. चिंचवड मतदारसंघाच्या भाजप आमदार अश्विनीताई जगताप, महापौर भाई ढोरे, पुणे नियोजन मंडळाचे सदस्य अप्पा रेणुसे, तंत्रज्ञ डॉ. मोहन फडके यांच्यातर्फे शोभा सोमनाचे यांचा स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन बेळगाव मित्र मंडळ पिंपरी-चिंचवड-पुण्याचे कार्यकर्ते मनोहर सोमणाचे, चंद्रकांत केदार, विठ्ठल कोल्हे, विनोद नलवडे, कणकुले व विजय वाडेकर यांनी केले होते. पाहुण्यांची ओळख प्रा. एम. डी. पाटील यांनी करून दिली. सूत्रसंचालन नामदेव तळपे यांनी केले. उत्तम तरळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास बेळगावमधील पुण्यात वास्तव्यास असलेले सदस्य उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.