महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पाटणा शहरातील आगीत बेळगावच्या लिफ्टचा बोलबाला

11:30 AM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उद्यमबागमध्ये बनलेल्या लिफ्टने वाचवले 44 जणांचे प्राण

Advertisement

बेळगाव : पाटणा (बिहार) शहरात एका हॉटेलला आग लागल्याची घटना गुरुवारी घडली. हॉटेलला भीषण आग लागल्याने हॉटेलमधील पर्यटकांना बाहेर काढण्याची जोखमीची जबाबदारी अग्निशमन दलावर होती. संपूर्ण हॉटेल आगीने वेढले असतानाही 44 पर्यटकांना बाहेर काढण्यात अग्निशमन विभागाला यश आले. विशेष म्हणजे या बचाव कार्यात वापरण्यात आलेली लिफ्ट ही बेळगावमधील एका कंपनीने तयार केली आहे. बेळगावमधील कामगारांनी तयार केलेल्या एरियल लिफ्टमुळे आज अनेकांचे जीव वाचले आहेत. बिहार येथील पाटणा शहरात स्टेशन रोडवर असणाऱ्या एका हॉटेलला गुरुवारी अचानक आग लागली. हॉटेलची इमारत बहुमजली असल्याने बचावकार्यात अडथळे येत होते. संपूर्ण इमारतीला आगीच्या ज्वाळांनी वेढल्याने अग्निशमन विभागाला व्यत्यय येत होता. अग्निशमन विभागाने शर्थीचे प्रयत्न करत टप्प्याटप्प्याने आग विझवत एरियल लिफ्टद्वारे हॉटेलमधील पर्यटकांना सुखरुप बाहेर काढले. एकूण 44 जणांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात अग्निशमन विभागाला यश आले. एरियल लिफ्टचे प्लॅटफॉर्म तसेच हैड्रोलिक, इलेक्ट्रिकल पॅनल व ऑपरेटिंग सॉफ्टवेअर हे बेळगावच्या उद्यमबागमधील अक्सरा टेक्नॉलॉजी प्रा. लि. ने बनविले आहे. 32 मीटरपर्यंत उंचीवरील कोणतेही सामान एरियल लिफ्टद्वारे जमिनीवर आणता येते. 2021 मध्ये या एरियल लिफ्टचे काम पूर्ण झाल्यानंतर ती लिफ्ट पाटणा येथे पाठविण्यात आली होती. बेळगावच्या कारागिरांनी तसेच तंत्रज्ञांनी तयार केलेल्या या एरियल लिफ्टमुळे आज शेकडो लोकांचे जीव वाचले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article