बेळगाव डीवायईएस ज्युडो संघ अव्वल
बेळगाव : बेळगाव क्रीडा वसतिगृहातील ज्युडो संघातील खेळाडूंनी वेगवेगळ्या क्षेत्रात आयोजित राज्यस्तरीय झालेल्या स्पर्धेमध्ये बेळगाव संघाने अतुलनिय कामगिरी करत उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश, भोपाळ, दिल्ली, राजस्थान, मणिपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली आहे. रामदुर्ग तालुक्यातील चंदरगी येथे कर्नाटक राज्य ज्युडो स्पर्धेत बेळगाव क्रीडा वसतिगृहातील खेळाडू तुकाराम लमाणी, वैभव पाटील, नेत्रा पत्रावळे, अंजली पाटील, दर्शन पाटील, धनुष्य एल. यांनी सुवर्णपदके पटकाविले तर यांची उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड झाली आहे. आंतरमहाविद्यालयीन ज्युडो स्पर्धेत भूषण वनारसे, सौरभ पाटील, रोहन बी. एस., राधिका डुकरे, साईश्वरी कोडचवाडकर यांना सुवर्णपदके पटकावून भोपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांसाठी त्यांची निवड झाली आहे.
राज्यस्तरीय शालेय ज्युडो स्पर्धेत आसिमा सल्मानी, मेघना मुल्या, कावेरी सूर्यवंशी, आरती मुरकुटे, सहाना बेलगली, वैष्णवी भडांगे, वैभव पाटील, अंजली पाटील, श्लोक कातकूर, तेजस, श्रेयल कौरी यांनी सुवर्णपदके पटकाविली असून त्यांची राजस्थान आणि मणिपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड झाली आहे. चित्रदुर्ग येथे झालेल्या राज्यस्तरीय पदवीपूर्व ज्युडो स्पर्धेत स्पंदना, श्वेता अलकनूर, दिव्या पाटील, सोनालिका सी. एस., आफ्रिन बानू, संगमेश मडली, बसलिंगय्य अथणीमठ, धनुष्य एल., आर्यन डोंगले, चंद्रशेखरगौड, प्रथमेश पाटील यांनी सुवर्णपदके मिळविली असून त्यांची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड झाली आहे. बी. श्रीनिवास, ज्युडो प्रशिक्षक रोहिणी पाटील आणि कुतुजा मुल्तानी तसेच कर्मचारी वर्गाने विजेत्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.