दसरा हॉकी स्पर्धेत बेळगाव विभागीय संघ तिसरा
डीवायईएस म्हैसूर विजेता, बेंगळूर ग्रामीण उपविजेता
बेळगाव : म्हैसूर येथे दसरा महोत्सव निमित्त सी.एम. चषक राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत बेळगाव विभागीय महिलांच्या संघाने या स्पर्धेत 6 गुणांसह तिसरे स्थान पटकाविले. या स्पर्धेत डीवायईएस म्हैसूर संघाने 12 गुणासह विजेतेपद तर बेंगळूर ग्रामांतर 9 गुणासह उपविजेतेपद तर 6 गुणांसह बेळगाव विभाग तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. म्हैसूर येथील चामुंडेश्वरी टर्फ हॉकी मैदानात घेण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात बेळगाव वि. बेंगळूर यामध्ये बेळगावने 3-0 असा पराभव केला. बेळगावतर्फे प्राजक्ता, भूमी व निलजकर यांनी प्रत्येकी 1 गोल केले.
दुसऱ्या सामन्यात बेळगाव ग्रामीण संघाने बेळगावचा 3-0 असा पराभव केला. तिसऱ्या सामन्यात डीवायईएस म्हैसूर संघाने बेळगाव विभागीय संघाचा 7-0 असा पराभव केला. चौथ्या सामन्यात बेळगाव विभागीय संघाने गुलबर्गा विभागीय संघाचा 1 असा निसटता विजय केला. बेळगावतर्फे विजयलक्ष्मी मुलीमनीने एकमेव गोल केला. दोन विजयासाठी बेळगाव विभागीय संघाला तिसऱ्या स्थानावरती समाधान मानावे लागले. या संघाला हॉकी संघटनेचे अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, विनोद पाटील, मनोहर पाटील, नामदेव सावंत, पूजा जाधव, बस्तवाडकर, यांनी या संघाचे कौतुक केले. या संघाला ज्येष्ठ हॉकीपटू सुधाकर चाळके व निवृत्त कॅप्टन उत्तम शिंदे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.