For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव जिल्ह्याकडे फुटबॉल चषक

12:17 PM May 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव जिल्ह्याकडे फुटबॉल चषक
Advertisement

राज्यस्तरीय सरकारी नोकर चषक आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा: हासन संघ उपविजेता

Advertisement

बेळगाव : बेंगळूर येथे राज्यस्तरीय सरकारी नोकर चषक आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बेळगाव जिल्हा नोकर संघाने हासन संघाचा सडनडेथमध्ये 7-6 असा पराभव करून प्रथमच सरकारी नोकर चषक पटकाविला. बेंगळूर येथे कंठिरव्वा मैदानावर राज्यस्तरीय सरकारी नोकर आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेत बेळगाव जिल्हा नोकर संघाने आपल्या पहिल्या सामन्यात विजापूर जिल्ह्याचा 6-0 असा पराभव केला. या सामन्यात अमित मासेकरने 2, किरण चव्हाणने 2 व पवन मासेकरने 2 गोल केले. उप-उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने दावणगिरी संघाचा 4-0 असा पराभव केला. बेळगाव जिल्हातर्फे लक्ष्मण तोडगीने 2, मोहम्मद अजिजीद्दिन व अल्लाबक्ष बेपारी यांनी प्रत्येकी 1 गोल केला.

उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने कोडगू संघाचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात पवन मासेकर व किरण चव्हाण यांनी प्रत्येकी 1 गोल केला. उपांत्य फेरीच्या सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने शिमोगा संघाचा 2-1 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात बेळगाव जिल्हातर्फे किरण चव्हाणने 2 तर शिमोगातर्फे राजनने 1 गोल केला. अंतिम सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने हासन संघाला सडनडेथमध्ये 6-5 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. निर्धारीत वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने पंचांनी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये दोन्ही संघांनी 5-5 अशी बरोबरी केली.

Advertisement

बेळगाव जिल्हा संघातर्फे अमित बिस्ती, प्रतीक, हणमंत, किरण चव्हाण, अल्लाबक्ष बेपारी यांनी गोल केले. तर हासनतर्फे राजेश, कल्पेश, श्रीधरन, अडव्याप्पा, शंकरन, यांनी केले गेले. त्यानंतर पंचांनी सडनडेथ नियमाचा वापर केला. बेळगाव जिल्ह्याच्या मोहम्मद अजिजीद्दिन यांनी गोल केला. तर हासनच्या मल्लाप्पाने चेंडू बाहेर मारला. मागिल पाच वर्षे बेळगाव नोकरी संघाने भाग घेऊन स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करत होता. पण यावर्षी या संघाला यश मिळवित विजेतेपद पटकाविले आहेत तर या विजेता संघाला चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले

Advertisement
Tags :

.