For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव जिल्हा संघ हॉकी स्पर्धेत विजेता

10:21 AM Oct 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव जिल्हा संघ हॉकी स्पर्धेत विजेता
Advertisement

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी कोडगूला जाणार

Advertisement

बेळगाव : चंदरगी येथे शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या विभागीय हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने धारवड जिल्हा संघाचा 1-0 असा निसटता पराभव करुन विजेतेपद पटकावित राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तो पात्र ठरला आहे. हा संघ कोडगू येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. चंदरगी येथे झालेल्या हॉकी विभागीय स्पर्धेत बेळगाव जिल्हा संघाने उपांत्यपूर्व सामान्यात चिकोडी जिल्हा संघाचा संघाला 4-0 नमवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने बागलकोट संघाचा 5-0 असा पराभव करुन अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यात बलाढ्या धारवाडच्या  डीवाएएस संघाचा अतितटीच्या लढतीत 1-0 असा निसटता पराभव करुन विजेतेपद पटकाविले.

कर्णधार मयुरी कंग्राळकर, नेत्रा गुरव, साक्षी पाटील, राधिका पाटील, साक्षी चौगुले, सविता चिगदीनकोप, आयेशा शेख, प्रीती नांदुडकर, ममता कुंभार, सानिका पाटील, श्रेया पाटील, अनुराधा मयेकर, या ताराराणी महाविद्यालयाच्या खेळाडू असून श्रेया गोलिहळ्ळी, वैष्णवी ईटनाळ, सेजल भावी, तनुश्री गावडे, निशा दोडमनी, भूमी लटकन, वैष्णवी नाईक या जी. जी. चिटणीस स्कूलच्या विद्यार्थिनीचा संघात समावेश आहे. या खेळाडूंना मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू, संचालक शिवाजीराव पाटील, परशराम गुरव,  मुख्याध्यापक राहुल जाधव यांचे प्रोत्साहन तर शाळेच्या क्रीडा शिक्षिका अश्विनी पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे. प्राचार्य अरविंद पाटील, सेक्रेटरी सुधाकर चाळके, निवृत्त कॅप्टन उत्तम शिंदे यांचे सहकार्य लाभत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.