महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

संविधान जागृती उपक्रमामध्ये बेळगाव जिल्हा द्वितीय

11:24 AM Apr 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : संविधानचा आशय आणि मूल्ये याबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी जिल्ह्यात संविधान जागृती जथ्याचे आयोजन केले होते. या उपक्रमाला बेळगाव विभाग पातळीवर द्वितीय क्रमांक मिळाला आहे. जिल्हा पाकलमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी या उपक्रमाला चालना दिली होती. भारतीय घटनेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी विविध विषयांवर प्रकाश टाकणारे स्तब्ध चित्ररथ आयोजित करण्यात आले होते. याद्वारे जिल्ह्यातील ग्रा. पं., नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व्याप्तीमध्ये जागृती करण्यात आली होती. याचे विविध संघ-संस्थांकडून स्वागत करून या उपक्रमाला पाठिंबा दर्शविण्यात आला होता. जिल्हा प्रशासन, जि. पं., समाज कल्याण खाते यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला होता. या संविधान जागृती जथ्याला विभाग स्तरावरील दुसरा क्रमांक मिळाला. या पुरस्कारासह 1 लाख रुपये देऊन गौरव करण्यात आला. हा पुरस्कार जिल्हाधिकारी नितेश पाटील व जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी स्वीकारला. यावेळी समाज कल्याण खात्याचे संचालक नवीन शिंत्रे, पोलीस आयुक्त एडा मार्टीन मार्बनिंग, निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख आर. बी. बसरगी, मनपा आयुक्त पी. एन. लोकेश, दलित नेते मल्लेश चौगुले आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article