For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव जिल्हा दसरा जलतरण स्पर्धा उत्साहात

10:28 AM Sep 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव जिल्हा दसरा जलतरण स्पर्धा उत्साहात
Advertisement

बेळगाव : बेळगाव जिल्हा युवजन सेवा व क्रीडा खाते तसेच जिल्हा आढळीत व जिल्हा पंचायत यांच्या सहकार्याने बेळगाव जिल्हा दसरा जलतरण स्पर्धां आयोजित करण्यात आल्या होत्या. गोवावेस येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावामध्ये या स्पर्धेचे उद्घाटन नितीन जाधव यांच्या हस्ते जलतरण तलावाची पूजा व श्रीफळ वाढून करण्यात आले. यावेळी उस्थित जलतरणपटूंना नितीन जाधव यांनी शुभेच्छा व्यक्त करून म्हैसूर दसरा येथे होणाऱ्या राज्य पातळी जलतरण स्पर्धेत बेळगावला भरभरून यश मिळवून देण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, प्रसाद सूणगार, सुनील हनमण्णवर, शुभांगी मंगळूरकर, सुधीर धामणकर, संदीप मोहिते, विजया शिरसाठ व इतर मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत अनेक मान्यवर जलतरणपटुनी भाग घेतला होता.

Advertisement

जलतरणपटूंची कामगिरी पुढील प्रमाणे पुरुष गटात 100 मी. ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात  1.) स्मरण मंगळूरकर 2) स्वयंम कारेकर 3) अनिश पै 200 मी. ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात 1) स्मरण मंगळूरकर 2) वेदांत पाटील 3) आदी शिरसाट, 100 मि. बॅकस्ट्रोक प्रकारात 1) धवल हनमनावर 2) चिन्मय बागेवाडी 3) प्रजित मयेकर, 200 मि. बॅकस्ट्रोक प्रकारात 1) धवल हनमनावर 2) चिन्मय बागेवाडी 3) सिद्धार्थ कुऊंदवाड, 100 मी. फ्रीस्टाइल प्रकारात 1) चिन्मय बागेवाडी 2) वरून धामणकर 3) आदी शिरसाट, 200 मी. फ्रीस्टाइल प्रकारात 1) आदी शिरसाठ 2) वेदांत पाटील 3) चिन्मय बागेवाडी, 400 मी. फ्रीस्टाइल प्रकारात 1) स्मरण मंगळूरकर 2) आदी शिरसाट 3) अनिश पै, 100 मी. बटरफ्लाय प्रकारात 1) स्वयम  कारेकर 2) स्मरण मंगळूरकर 3) वरून धामणकर 200 मी. वैयक्तीक मिडले प्रकारात 1)़ वेदांत पाटील 2) स्मरण मंगळूरकर 3) आदी शिरसाठ यांनी विजेतेपद पटकाविले.

महिला -100 मी. ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात 1) सामिया मनसे 2) शर्मिष्ठा मालाई  3) प्राची कदम, 200 मी. ब्रेस्ट स्ट्रोक 1) सामिया  मेनसे 2) सृष्टी कंग्रराळकर 3) वैशाली घाटेगस्ती, 100 मी. बॅकस्ट्रोक प्रकारात 1) वैशाली घाटेगस्ती  2) विजयलक्ष्मी पुजार 3) सायली घूगरेटकर, 200 मी. बॅकस्टोक प्रकारात 1) वैशाली घाटेगस्ती 2) विजयलक्ष्मी पुजार 3) राधिका मोहनगेकर, 100 मी. फ्रीस्टाइल प्रकारात 1) शर्मिष्ठा  मालाई 2) विजयलक्ष्मी पुजार 3) प्राची कदम, 200 मी. फ्रीस्टाइल प्रकारात 1) शर्मिष्ठा मलाई 2) वैशाली घाटेगस्ती 3) सृष्टी कंग्रराळकर, 400 मी. फ्रीस्टाइल प्रकारात 1)़ शर्मिष्ठा मलाई , 2) सामिया मनसे 3) प्राची कदम, 100 मी. बटरफ्लाय प्रकारात 1) सामिया मेनसे 2) प्राची कदम 3) राधिका मोहनगेकर, 200 मी. वैयक्तीक मिडले प्रकारात 1) शर्मिष्ठा मलाई 2) सामिया मेनसे 3.) वैशाली घाटे गस्ती यांनी विजेतेपद मिळविले.

Advertisement

वरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आबा व हिंद क्लबचे प्रशिक्षक अमित जाधव, रणजीत पाटील, शिवराज मोहिते, विशाल वेसणे, कलाप्पा पाटील, किशोर पाटील, भरत पाटील, विजय नाईक, निखिल भेकणे, प्रसाद दरवंदर, ओम लोहार, ओम घाडी, चंद्रकांत बेळगोजी यानी विशेश परिश्रम घेतले.

Advertisement
Tags :

.