महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वाघाच्या शिकार प्रकरणी बेळगावच्या ढाबाचालकाला अटक

11:53 AM Sep 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आणखी एकाची चौकशी करून पोलिसांकडून सुटका

Advertisement

बेळगाव : दांडेलीजवळील बर्ची वनविभागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या वाघाच्या शिकारीप्रकरणी बेळगाव येथील एका ढाबाचालकाला अटक करण्यात आली असून आणखी एका तरुणाला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या कारवाईने एकच खळबळ माजली आहे. नाना केसरोडगा येथील जंगलात वाघाचा मृतदेह आढळून आला होता. यासंबंधी 18 डिसेंबर 2022 रोजी बर्ची वनविभागात एफआयआर दाखल करण्यात आला होता. (क्र. 02/2022-23). या प्रकरणाचा छडा लावण्यात वनविभागाला यश आले असून शिकाऱ्यांचे धागेदोरे बेळगाव परिसरात पोहोचले आहेत.

Advertisement

सोमनाथ भरमा पाटील, रा. अतिवाड, पोस्ट बेकिनकेरे या ढाबाचालकाला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आल्याची माहिती हल्याळ विभागाच्या वन अधिकाऱ्यांनी दिली आहे. याप्रकरणी तानाजी गल्ली, बेळगाव येथील इंद्रजित घसारी याचीही चौकशी करण्यात आली आहे. याप्रकरणी वनविभागाने आणखी तिघांचा शोध सुरू केला आहे. बेळगाव येथील एका युवकाबरोबरच एका होम स्टे मालकासाठीही शोधमोहीम सुरू आहे. उपलब्ध माहितीनुसार इंद्रजितची चौकशी करून शुक्रवारी सायंकाळी सुटका केली आहे. नाना केसरोडगा जंगलात वाघाची शिकार करण्यात आली होती. सीसीटीव्हीचे फुटेज व मोबाईल टॉवर लोकेशनवरून जगलबेट येथील अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा छडा लावला असून एका होम स्टेमध्ये वास्तव्य करून वाघाची शिकार करण्यात आली होती, अशी माहिती मिळाली आहे. मात्र, चौकशी सुरू असल्यामुळे यासंबंधी अधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली नाही.

अनेकांना वाघनखांचीही विक्री केल्याची चर्चा 

वनविभागाने केलेल्या या कारवाईमुळे शिकारीसाठी बेळगावहून खानापूर, दांडेली परिसरात जाणाऱ्या शिकाऱ्यांचे किस्से ठळक चर्चेत आले आहेत. कोणाचा वाढदिवस असो किंवा कसला कार्यक्रम असो, जंगलात वन्यप्राण्यांची शिकार करून फस्त करण्यात येत होते. सराईत शिकाऱ्यांची टोळीच बेळगाव परिसरात वावरते आहे. या टोळीने अनेकांना वाघनखांचीही विक्री केल्याची चर्चा सुरू असून वनविभागाच्या चौकशीतून आणखी माहिती बाहेर पडणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article