बेळगाव सिव्हिल इंजिनिअरींग संघाला जेतेपद
10:30 AM Apr 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : हुबळी येथे सिव्हिल इंजिनिअरींग व कन्सल्टींग संघटनेतर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेत बेळगावच्या सिव्हिल इंजिनिअरींग संघाने विजेतेपद पटकाविले आहे. चेतन देसाई याला सामनावीर तर बसवराज हम्मन्नावर यांना उत्कृष्ट गोलंदाजाने गौरविण्यात आले. हुबळीच्या नेहरु स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या सिव्हिल इंजिनिअरींग व कन्सल्टिंग संघटनेतर्फे राज्यस्तरीय जिल्हा क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. अंतिम सामन्यात बेळगाव संघाने विजेतेपद पटकाविले. प्रमुख पाहुणे रमेश जे. टी., चंद्रकांत मणगुत्ती, विरेश शेट्टण्णावर, मलिकार्जुन पाटील, निलेश पाटील, अर्पित तुबजी आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक, रोख रक्कम देवून गौरविले. स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज बसवराज हम्मण्णावर तर अंतिम सामन्यातील सामनावीर चेतन देसाई यांना बक्षीस देवून गौरविण्यात आले.
Advertisement
Advertisement