महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेळगाव सीमा वासियांची 'चलो कोल्हापूर' ची हाक

05:27 PM Jan 14, 2025 IST | Pooja Marathe
Advertisement

१७ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालया समोर करणार आंदोलन
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी : सर्वोच्च न्यायालयातील खटल्याकडे सरकारचं दूर्लक्ष
समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांची माहिती
कोल्हापूर
महाराष्ट्र सरकारनं सीमाप्रश्नी कणखर भुमिका घेतली तरच हा प्रश्न सुटणार आहे. पण सर्वोच्च न्यायालयात सीमप्रश्नी दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणीकडे महाराष्ट्र सरकारचे दूर्लक्ष होत आहे. परिणामी सीमाप्रश्न प्रलंबीतच राहत आहे. महाराष्ट्र सरकारंचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहे. शुक्रवारी करण्यात येणाऱ्या आंदोलनात सुमारे चारशेहून अधिक सीमावासीय सहभागी होतील, अशी माहिती समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी दिली.
सीमाप्रश्न तत्काळ मार्गी लागावेत, त्यासाठी प्रयत्नशील व्हावे अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येईल.
कार्याध्यक्ष किणेकर म्हणाले, सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारन तर्फे केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा होणे ठेवणे आवश्यक आहे. तरच या प्रश्नाला गती मिळणार आहे. जुलै २००४ मध्ये सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारनेचे सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला. खटल्याच्या बहुतांश सुनावणीला महाराष्ट्राचे नेते, वकील उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातही हा प्रश्न जैसे थे स्थितीत राहिला आहे. उलट कर्नाटक सरकराचे मंत्री अथवा वकील प्रत्येक सुनावणीला हजर राहतात. त्यामुळे महाराष्ट्र सरकार सीमाप्रश्नी गंभीर नाही का, अशी शंका सीमाभागात उपस्थित होत असल्याचे कार्याध्यक्ष किणेकर यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, १७ जानेवारी हा दिवस बेळगावात हुतात्मा दिनी म्हणून साजरा होतो. यादिवशी बेळगांव येथे हुतात्म्यांना अभिवादन करुन दुपारी ३ वाजता चारशेहून अधिक सीमाबांधव येथे जिल्हाधिकारी यांची भेट घेवून त्यांना निवेदन देणार आहे. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोल्हापूरातील सर्वपक्षीय नेत्यांसमवेत धरणे आंदोलन करण्यात येईल. यावेळी पत्रकार परिषदेला समितीचे सदस्य एम. जी. पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे उपस्थित होते.
सीमाभागातील मराठी भाषा, संस्कृती धोक्यात
सीमाप्रश्नाकडे महाराष्ट्र सरकारचे दूर्लक्ष होत असल्याने कर्नाटक सरकारला वाव मिळत आहे. सीमाभागातील मराठी शाळा हळूहळू बंद केल्या जात आहेत. तसेच अन्य अशा सक्तींमुळे सीमाभागातील मराठी भाषा अन् संस्कृती धोक्यात आली असल्याचे समितीचे प्रकाश मरगाळे यांनी दिली.
सीमाप्रश्नाची आंदोलन आता कोल्हापुरातच
सीमाप्रश्नी बेळगावांत आंदोलन केल्यास कर्नाटक पोलीस प्रशासनाकडुन आंदोलकांवर गंभीर गुन्हे दाखल केले जात आहेत. गुन्हांमुळे विशेषत: आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. तसेच सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकरानेच सातत्याने पाठपुरावा केला, तरच हा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे सीमाप्रश्नी होणारी आंदोलने आता कोल्हापुरातच करणार असल्याचे मरगाळे यांनी सांगितले.
1 मे रोजी मुंबईत आंदोलन
महाराष्ट्रात 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा होतो. मात्र सीमाभागातील नागरिक अद्यापही या अधिकारापासून वंचित आहेत. त्यामुळे हा अधिकार सीमावासियांना मिळावा, सीमाप्रश्न तत्काळ सुटावा यासाठी 1 मे रोजी मुंबईतही आंदोलन करण्याचे नियोजन सुरु असल्याचे मरगाळे यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article