For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोवा राज्य रोलर स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंची चमक

10:16 AM Feb 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
गोवा राज्य रोलर स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंची चमक
Advertisement

बेळगाव : गोवा येथील एए रोलर स्केटिंग क्लब आणि गोवा राज्य रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित 5 वी टॅलेंटहंट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन स्केटर्सनी 9 सुवर्ण, 3 रौप्य व 2 कांस्य पदके अशी एकूण 14 पदके पटकावित यश संपादन केले. या स्पर्धेत रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भाग घेतल होता. 25 आणि 26 जानेवारी 2025 मडगाव-गोवा येथे या स्पर्धेत झाल्या. एकूण 450 हून अधिक स्केटिंगपटूंनी भाग घेतला होता. यामध्ये जान्हवी तेंडुलकरला 3 सुवर्ण, प्रितम बागेवाडी 3 सुवर्ण, सौरभ साळोखेला 3 सुवर्ण, आरशन माडीवालेने 3 रौप्य, अमिषा वेर्णेकर 2 कांस्य पदके पटकाविली. स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे आणि विश्वनाथ यळ्ळूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली केएलई स्केटिंग रिंक, गुड शेफर्ड सेंट्रल स्कूलच्या स्केटिंग रिंक व शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे सराव करत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.