For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव विमानतळाने सांबरा ग्रा.पं.चा कर थकविला

06:41 AM Sep 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव विमानतळाने सांबरा ग्रा पं चा कर थकविला
Advertisement

3 कोटी 69 लाखांचा कर थकीत

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव विमानतळाने सांबरा ग्राम पंचायतीचा 3 कोटी 69 लाख रुपयांचा कर थकविला आहे. विमानतळ सांबरा ग्राम पंचायतअंतर्गत येत असल्यामुळे टर्मिनलचे बांधकाम तसेच इतर विकासकामांसाठी कर लावण्यात आला होता. 2017-18 पासून कर भरण्यात आला नसल्याने ही थकबाकी 3 कोटींच्या वर पोहोचली आहे. 2022 मध्ये सांबरा विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार इमारतींचे मोजमाप करून कर निश्चित करण्यात आला होता. प्रतिवर्षी 46 लाख 13 हजार रुपये कर विमानतळाला जमा करावा लागतो. परंतु 2017 पासून कर जमा करण्यात आलेला नाही. यापूर्वीही ग्राम पंचायतीच्यावतीने विमानतळाला नोटीस पाठविण्यात आली होती. परंतु अद्याप कर भरण्यात आलेला नाही. कर अधिक असल्यामुळे यामध्ये कपात करावी, अशी मागणी विमानतळ प्रशासनाने राज्याच्या पंचायतराज खात्याकडे पत्राद्वारे केली होती. परंतु पंचायतराज खात्याने हा प्रस्ताव नामंजूर केला. ग्राम पंचायतीला थकीत कर मिळावा यासाठी  सदस्यांची धडपड सुरू आहे. खासदारांची भेट घेऊन त्यांच्याकडून मागणी करण्यात आली आहे.

Advertisement

कर भरण्यासाठी नोटीस

बेळगावच्या सांबरा विमानतळाने 2017 पासून कर भरणे बाकी आहे. कर लवकर भरावा यासाठी विमानतळ प्रशासनाला यापूर्वीच नोटीस बजावण्यात आली आहे.

 -राहुल शिंदे (जि. पं. सीईओ)

Advertisement
Tags :

.