For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेलकॉन 2026 गृहनिर्माण प्रदर्शन उद्यापासून

11:59 AM Feb 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
बेलकॉन 2026 गृहनिर्माण प्रदर्शन उद्यापासून
Advertisement

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची उपस्थिती

Advertisement

बेळगाव : क्रिडाई बेळगावच्या बेलकॉन 2026 या भव्य बांधकाम आणि गृहनिर्माण प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार दि. 5 रोजी होणार आहे. सायंकाळी 4 वा. क्लब रोड येथील सीपीएड मैदानावर हे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले आहे. बेंगळूरनंतर बेळगावमध्ये असे भव्य प्रदर्शन वातानुकूलित शामियान्यामध्ये होणार आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी कर्नाटक क्रिडाईचे अध्यक्ष भास्कर नागेंद्रप्पा व अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती असणार आहे. सीपीएड मैदानावरील एक लाख स्क्वेअर फूटमध्ये उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठे बांधकाम व गृहनिर्माण क्षेत्रातील प्रदर्शन होणार आहे. 180 स्टॉल तर बेळगाव शहरातील 300 हून अधिक रियल इस्टेट प्रकल्पांचे प्रदर्शन होणार आहे. बांधकाम, बँकिंग क्षेत्रातील नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. घरे, फ्लॅट, भूखंड, व्यावसायिक भूखंड, संकुल, बांधकाम साहित्य, सोलार, फर्निचर आदी साहित्याचा यामध्ये समावेश असणार आहे.

बेलकॉन प्रदर्शनाला प्रिया शक्ती स्टील, ओरिओनीस बिल्डर्स, जीएम इलेक्ट्रिकल्स, श्रीराम इनोव्हेशन, विशाल इन्फ्राबिल्ड, वीवा डेव्हलपर्स, अमर कन्स्ट्रक्शन, साईराज बिल्डर्स, चैतन्य प्रॉपर्टीज, नुरानी डेव्हलपर्स, पार्वती कन्स्ट्रक्शन, कोने एलिवेटर्स, यश पॉली, विजय धामणेकर,फॅबटेक, स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी प्रायोजकत्व दिले आहे. 5 ते 8 फेब्रुवारीपर्यंत बेळगावसह उत्तर कर्नाटक, गोवा व पश्चिम महाराष्ट्रातील दीड लाखाहून अधिक लोक प्रदर्शनाला भेट देतील, असा आयोजकांना विश्वास आहे. सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत प्रदर्शन खुले राहणार आहे. प्रदर्शनासाठी अध्यक्ष युवराज हुलजी, इव्हेंट चेअरमन प्रशांत वांडकर, व्हाईस चेअरमन प्रशांत पाटील, सुधीर पनारे, सचिन बैलवाड, आनंद कुलकर्णी, सचिन कळ्ळीमनी, ज्ञानेश्वर सायनेकर, विरेश शेट्टेण्णावर, राजेश माळी, दीपकुमार शेख, दीपक गोजगेकर, महिला विभाग कर्नाटक राज्य समन्वय दीपा वांडकर, करुणा हिरेमठ, सविता सायनेकर आदी मेहनत घेत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.