For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

बेळगाव-अहमदाबाद व्हाया नवी मुंबई विमानसेवा

07:30 AM Oct 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव अहमदाबाद व्हाया नवी मुंबई विमानसेवा
Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

बेळगाव-अहमदाबाद सुरू असलेली थेट विमानसेवा काही महिन्यांपूर्वी बंद झाली. यामुळे व्यवसाय, व्यापाराच्या दृष्टीने प्रवास करणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मोठ्या महानगरांतून कनेक्टिंग विमानाने अहमदाबाद गाठावे लागत होते. परंतु आता बेळगावमधून अहमदाबाद व्हाया नवी मुंबई असा प्रवास करणे शक्य होणार आहे.

इंडिगो एअरलाईन्सने बेळगाव-अहमदाबाद व्हाया नवी मुंबई ही विमानसेवा सुरू केली आहे. आठवड्यातून चार दिवस रविवार, सोमवार, बुधवार व शुक्रवार सेवा दिली जाणार आहे. 3 तास 10 मिनिटांमध्ये एकाच विमानातून बेळगावमधून अहमदाबाद हा प्रवास करता येईल.

Advertisement

सायंकाळी 5.30 वाजता बेळगावमधून निघालेले विमान व्हाया नवी मुंबई मार्गे रात्री 8.40 वाजता अहमदाबादला पोहोचणार आहे. यामुळे नागरिकांना गोवा अथवा इतर शहरांतून अहमदाबाद गाठण्याऐवजी ही विमानसेवा उत्तम ठरणार आहे. कापड व्यावसायिक, उद्योजकांची अहमदाबादला नेहमी ये-जा असल्याने या विमानसेवेमुळे त्यांची सोय होणार आहे.

Advertisement
Tags :

.