महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

वाद्यांच्या गजरात बेकवाड लक्ष्मीदेवीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम

10:18 AM Mar 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महिलांसह भाविकांची अमाप गर्दी

Advertisement

वार्ताहर /नंदगड

Advertisement

बेकवाड येथील लक्ष्मीदेवी यात्रा गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या उत्साहात सुरू  आहे. बुधवारी पहाटे देवीचा विवाह सोहळा झाला. त्यानंतर देवीची मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी देवीला गदगेवर स्थानापन्न करण्यात आले. गुरुवारी दिवसभर अनेक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. रात्री मनोरंजनाचे विविध कार्यक्रम झाले. शुक्रवार दि. 1 मार्च रोजी पहाटेपासून मानाप्रमाणे पंचांच्या व मानकऱ्यांच्या ओट्या तसेच ग्रामस्थांच्या ओट्या भरण्यात आल्या. महिलांसह अनेक भाविक यावेळी उपस्थित होते. ओट्या भरतेवेळी सर्वत्र वाद्यांचा गजर होत होता. ओट्या व पूजेच्या साहित्यासह महिला मोठ्या भक्तिभावाने उपस्थित होत्या. गावातील भाविकांनी ओट्या भरल्यानंतर माहेरवासिनी व पै पाहुणे यांनी ओट्या भरून देवीचे दर्शन घेतले. रात्री मनोरंजनाचे विविध कार्यक्रम झाले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article