सिंगल राहिल्यास मिळते शिक्षा
जेव्हा एखादा युवक किंवा युवती 22-23 वर्षांची झाल्यावर कुटुंबीय त्यांच्या विवाहासाठी अनुरुप जोडीदार बघण्यास सुरुवात करतात. आताच पाहिले नाही तर 4-5 वर्षांनी विवाह कसा होईल असे अशाप्रसंगी बोलले जाते. परंतु एका देशात वेगळीच प्रथा दिसून येते. तेथे कुठल्याही युवक किंवा युवतीचा विवाह वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत झाला नाही तर त्याच्या पूर्ण शरीराला दालचिनींद्वारे स्नान घातले जाते. तर संबंधिताचे वय 30 वर्षे झाले असेल तर ही प्रक्रिया काळ्या मिरीसोबत पार पाडली जाते.
ही प्रथा अशावेळी पार पाडली जाते, जेव्हा एखादा व्यक्ती 25 वर्षांचा होतो आणि तोपर्यंत त्याचा विवाह झालेला नसतो किंवा तो विवाह करण्यास तयार नसतो. परंतु सद्यकाळात ही शिक्षा देखील खूपच कमी प्रमाणात दिसून येते. परंतु कुणासोबत जबरदस्तीने नव्हे तर थट्टेपोटी ही शिक्षा दिली जाते. परंतु डेन्मार्कच्या लोकांनुसार तेथे दीर्घकाळापासून या शिक्षेची अंमलबजावणी दिसून आलेली नाही.
संबंधित व्यक्तीला पायाच्या अंगठ्यापासून डोक्यावरील केसांपर्यंत चांगल्याप्रकारे दालचिनीने स्नान करविले जाते. अनेकदा तर लोक संबंधित व्यक्तीने दालचिनीच्या पाण्यात टाकतात. स्नान करविण्याची ही प्रक्रिया घरात नव्हे तर रस्त्यांवर केली जोत. अनेकदा तर दालचिनीसोबत अंडेही मिसळले जाते, तर एखादा व्यक्ती 30 वर्षांचा झालेला असेल तर त्याला काळ्या मिरीने स्नान घातले जाते.
ही परंपरा अत्यंत जुनी आहे. वर्षांपूर्वी मसाल्यांचे व्यापारी बाहेर फिरायचे तेव्हा त्यांचा विवाह दीर्घकाळ होत नव्हता. त्यांना चांगला जोडीदार मिळत नव्हता. अशा सेल्समॅनला पेपर ड्यूड्स आणि महिलांना पेपर मॅडेन्स म्हटले जायचे. मग त्यांच्या मसाल्यांचे कनेक्शन जोडण्यात आले आणि ही परंपरा तेथून सुरू झाली.