कोका-कोलाचा आयपीओ येण्यापूर्वी होणार कंपनी बंद
भारतामधील बॉटलिंग गुंतवणूक विभाग बंद करण्याची कंपनीची घोषणा
नवी दिल्ली :
लोकप्रिय कोल्डड्रिंक कंपनी कोका कोलाने आपला बॉटलिंग गुंतवणूक विभाग बंद करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने बॉटलिंग इन्व्हेस्टमेंट समूहाच्या माध्यमातून भारतासह जगभरात बाटलीबंद व्यवसाय चालवला.
कोका-कोलाचे अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय विकास, हेन्रिक ब्रॉन यांनी म्हटले आहे, ‘बिग’चे मुख्यालय बंद करण्याची आणि आमच्या उर्वरित बॉटलिंग गुंतवणुकीवर अधिक सुव्यवस्थित पद्धतीने देखरेख करण्याची हीच योग्य वेळ आहे. भारत, नेपाळ आणि श्रीलंका ‘आपल्या अंतर्गत मंडळाच्या देखरेखीखाली राहतील’ असेही त्यांनी म्हटले आहे.
भारताला याचा फटका
अमेरिकन कोल्ड्रिंक कंपनीच्या या निर्णयाचा थेट परिणाम भारतावर होणार आहे. खरं तर, कोका-कोला इंडियाच्या मालकीची बॉटलिंग कंपनी बिग बॉटलिंग इन्व्हेस्टमेंट ग्रुप हिंदुस्थान कोका-कोला बेव्हरेजेस (एचसीसीबी) नियंत्रित करते. यापूर्वी असे वृत्त आले होते की कोका-कोलाने एचसीसीबीमधील महत्त्वपूर्ण भागीदारी विकण्यासाठी चार मोठ्या उद्योगपतींशी संपर्क
साधला आहे. कंपनीने प्रारंभिक
सार्वजनिक प्रस्ताव (आयपीओ) च्या आधी मूल्य अनलॉक करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.
कोका-कोलाची आयपीओसाठी तयारी
बॉटलिंग कंपनी हिंदुस्थान कोका-कोला बेव्हरेजेस भारतात आपला आयपीओ लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. सूचीबद्ध योजना अंतर्गत चर्चेत आहे आणि एचसीसीबी सूचीसाठी ब्ल्यू प्रिंट तयार करण्यासाठी बँकर्सशी कंपनी चर्चा करत असल्याचे समजते. अद्याप सूचीसाठी कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही, कंपनी भारताबद्दल आशावादी आहे, महत्त्वाची बाजारपेठ म्हणून कंपनी भारताकडे पाहते. अर्थव्यवस्थेत तेजी असताना देशात आयपीओमध्ये वाढ होत आहे.