कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राज्यात बियर महागणार!

06:05 AM May 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अबकारी कर 10 टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

डिझेलवरील कर, विद्युत शुल्क आणि दूध दरवाढीनंतर आता राज्य सरकारने बियरवरील अबकारी कर 10 टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना धक्का बसणार आहे. सध्या कर्नाटकात बियरवरील अतिरिक्त अबकारी कर उत्पादन खर्चाच्या 195 टक्के आहे. तो 205 टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा उल्लेख नव्या मसुदा नियमात आहे. उत्पादन खर्चानुसार प्रीमियम किंवा इतर बियर ब्रॅण्डची किंमत 10 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.

एकंदर करवाढीनंतर बियरची किंमत 10 रुपयांनी वाढू शकते. मध्यम श्रेणीच्या आणि स्वस्त स्थानिक बियरच्या किमतीत 5 रु. वाढ होण्याची शक्यता आहे. दरवाढ बियरच्या ब्रॅण्डनुसार बदलू शकते. यापूर्वी बियरसाठी दोन स्तरावर करप्रणाली होती. कमी स्तरावरील ब्रॅण्डसाठी प्रतिलिटर 130 रु. पर्यंत कर लागू केला जात होता. तर इतर ब्रॅण्डसाठी शेकडानिहाय कर आकारली जात होती. आता ही पद्धत रद्द करण्यात आली आहे. सर्व बियरसाठी एकसमान 205 टक्के कर निश्चित करण्यात येणार आहे. करप्रणाली सुलभ करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. कमी कर श्रेणी काढून टाकण्यासह सर्व ब्रॅण्डच्या बियरसाठी एकच प्रकारे कर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले आहे.

तिसऱ्यांदा दरवाढ

सध्याच्या प्रस्तावित बियर करात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे 3 वर्षात तिसऱ्यांदा बियरवरील कर वाढणार आहे. जुलै 2023 मध्ये काँग्रेस सरकारने अतिरिक्त अबकारी कर 175 टक्क्यांवरून 185 टक्के केला होता. 20 जानेवारी 2025 रोजी पुन्हा करवाढ करण्यात आली. त्यामुळे बियरवरील अबकारी कर 195 पर्यंत किंवा प्रति बल्क लिटरसाठी 130 रुपयांपर्यंत (जे जास्त आहे, त्याला अनुसरून) दरवाढ केली होती. आता पुन्हा दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात अला आहे.

मूळ अबकारी शुल्कातही सुधारणा करण्यात आली आहे. फ्लॅट रेटऐवजी अल्कोहोलच्या प्रमाणावर आधारित एकस्तरिय प्रणाली सुरू करण्यात आली आहे 5 टक्के किंवा त्यापेक्षा कमी अल्कोहोल प्रमाण असलेल्या बियरसाठी प्रति बल्क लिटर 12 रुपये आणि 5 ते 8 टक्के अल्कोहोल असलेल्या बियरसाठी 20 रुपये निश्चित करण्यात आले आहे.

लघु मालवाहू वाहनांवरील करवाढ आजपासून लागू

राज्यात 1 मेपासून नवे वाहन खरेदीसाठी नवे कर धोरण लागू होत आहे. वाहन कर वाढविण्याच्या कर्नाटक मोटार वाहन कर दुरुस्ती विधेयकाला मंगळवारी राज्यपालांकडून मंजुरी मिळाली आहे. यामुळे 10 लाखापर्यंतची लघू मालवाहू वाहने महागणार आहेत. राज्य सरकारने टॅक्सी, लघु मालवाहू वाहनांवरील आजीवन कर 5 टक्क्यांनी वाढविला आहे. व्यावसायिक वापरासाठी असलेल्या इलेक्ट्रिक वाहनांवरील करही वाढणार आहे. 25 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या व्यावसायिक इलेक्ट्रिक वाहनांवरील कर 10 टक्क्यांनी वाढला आहे.

Advertisement
Next Article