For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिअरप्रेमींना पुन्हा धक्का 10 ते 45 रुपयांपर्यंत दरवाढ

06:11 AM Jan 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
बिअरप्रेमींना पुन्हा धक्का 10 ते 45 रुपयांपर्यंत दरवाढ
Advertisement

राज्य सरकारकडून वर्षभरात तिसऱ्यांदा वाढ

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

मद्यप्रेमींना राज्य सरकारने पुन्हा धक्का दिला आहे. अर्थसंकल्पापूर्वीच बिअरच्या दरात 10 ते 45 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सोमवारपासूनच दरवाढ लागू झाली आहे. मागील 12 महिन्यांच्या काळातील ही तिसरी दरवाढ आहे. त्यामुळे बिअरप्रेमींना धक्का बसला आहे. सर्वसाधारणपणे अर्थसंकल्पात मद्यावरील अबकारी करवाढ घोषित केली जाते.  मात्र, यावेळी अर्थसंकल्पाआधीच अबकारी कर वाढविण्यात आला आहे. महागड्या बिअरच्या किमती वाढलेल्या नाहीत. 300 रुपयांच्या आतील बिअरच्या किमती वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे मद्यविक्रेते आणि ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे. सहा महिन्यांपूर्वी आयात वस्तुंच्या शुल्कात वाढ झाली होती. त्यामुळे सिद्धरामय्या यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने बिअरवरील करात वाढ केली आहे. लोकप्रिय असणाऱ्या लेजंड बिअर, पॉवरकूल, ब्लॅक फोर्ड, हंटर, वुडपिकर क्रेस्ट आणि वुडपिकर ग्लाईड यासारख्या बिअरच्या किमती 10 ते 45 रुपयांनी वाढल्या आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.