मटणाऐवजी दिले बीफ, कोलकात्तामधील घटना
06:16 AM Feb 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ कोलकात्ता
Advertisement
कोलकात्तामधील प्रसिद्ध पार्क स्ट्रीट परिसरातील एका हॉटेलमध्ये ग्राहकाला मटणाऐवजी बीफ वाढण्यात आल्याने मोठा गदारोळ उडाला. याप्रकरणी वेटरला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्याची धार्मिक ओळख पुढे आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले.
ओलीपब रेस्टारंटमध्ये हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सायक चक्रवर्ती हा मित्रांसह येथे जेवणास गेला होता. त्यांनी मटन स्टेकची ऑर्डर दिली होती. परंतु तेथील कर्मचाऱ्यांनी बीफ वाढले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे. तसेच त्या वेटरला अटकही केली असून तपासानंतर हे जाणूनबुजून की नजर चुकीने झाले ते समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
Advertisement
Advertisement