Beed Crime तोंडात लघुशंका, अमानुष मारहाण बीडमध्ये संतोष देशमुख प्रकरणाची, पुनरावृत्ती, राज्यभरात संताप
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका ऊसतोडणी मजुराला डांबून ठेवून अत्यंत अमानुषपणे मारहाण केल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार बीडमधील ऊसतोडणी मजूर देवीदास कापसे यांची मुकादम गणेश थोरात याच्याकडून काही पैसे आगाऊ घेतले होते.
या पैशातून झालेल्या वादानंतर मुकादम गणेश थोरात आणि त्याच्या सहकाऱ्यांनी देविदास कापसे यांचे अपहरण केले. यावेळी त्यांना चार दिवस डांबून ठेवत बेदम मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्या तोंडात लघुशंका केली. या घटनेप्रकरणी पोलिसांनीही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्यामुळे बीडमधील गुन्हेगारी आणि मुकादमगिरीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे मुकादम कापसे याने आपल्या सहकाऱ्यांसह अपहरण केल्यानंतर अमानुष मारहाण करत कापसे यांच्या तोंडात लघुशंका केल्याची अमानवी घटना समोर आली आहे. या घटनेनंतर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार पिडीत देवीदास कापसे यांच्या आईने यासंदर्भातील तक्रार करण्यासाठी देवराई पोलीस ठाण्यात धाव घेतली असता पोलिसांनी हे प्रकरण दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांच्या भूमीकेवरही संशय असल्याची चर्चा परिसरात होत आहे.