For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

बीडमध्ये बस-कारचा भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू

05:19 PM Oct 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
बीडमध्ये बस कारचा भीषण अपघात  पाच जणांचा जागीच मृत्यू
Advertisement
बीड, प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील पंढरपूर–खामगाव पालखी महामार्गावर शिंदेवाडी फाट्याजवळ बस आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. माजलगाव येथून तुळजापूरला आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव येथील एक कुटुंब कारने तुळजापूरच्या दिशेने जात होते. दरम्यान, शिंदेवाडी फाट्याजवळ कारची बसशी जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला, तर बसच्या पुढील भागाचेही मोठे नुकसान झाले. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातामुळे महामार्गावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

Advertisement

अपघातानंतर ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन

या दुर्घटनेनंतर शिंदेवाडी परिसरातील संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. शिंदेवाडी फाट्याजवळ रस्त्यावर असलेल्या जंपमुळे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना करून भविष्यात अशा दुर्घटना टाळाव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली.

Advertisement

या भीषण अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून, रस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अपघाताबाबत अधिकृत तपशील आणि पुढील कारवाईची माहिती मिळणे बाकी आहे.

Advertisement
Tags :

.