महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कमी किमतीत विकले जातेय सुंदर गाव

06:10 AM Nov 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सुंदर घर खरेदी करणे तसे प्रत्येकाचेच स्वप्न असते. परंतु माणसाला स्वत:च्या बजेटनुसार फ्लॅट किंवा छोट्या घरातच समाधान मानावे लागते. अशा स्थितीत जर कुणी पूर्ण गाव खरेदी करण्याची इच्छा बाळगून असल्यास त्याच्याकडे मोठी रक्कम असणे अपेक्षित आहे. परंतु प्रत्यक्षात असे नाही. अत्यंत कमी किमतीत पूर्ण गाव मिळत असल्याचे कळल्यावर तुम्ही दंग व्हाल.

Advertisement

सर्वसाधारणपणे ज्या किमतीत लोक एक बंगला खरेदी करू शकतात, तितक्या रकमते रोमानियामध्ये एक गाव विकले जात आहे. या गावाला रियल इस्टेट प्लेयर सोथबी इंटरनॅशनलकडून विकण्यात येत आहे. याकरता सादर करण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये गावाचे सौंदर्य, रोमानियन वास्तुकला आणि आधुनिक सुखसुविधांची झलक दिसून येते.

Advertisement

या गावातील घरं अत्यंत आकर्षक, रंगीत आणि अत्यंत सजविलेली आहेत. हिरव्या आणि निळ्या रंगाचे दरवाजे, लाकडी छत आणि लाकडाच्या बीमने सजविलेले घर, क्षेत्रातील समृद्ध इतिहास दर्शवितात. येथील दगडाच्या स्टोअररुममध्ये एका छतावर बगीचा आहे. येथे झाडावर तयार करण्यात आलेले सुंदर घर, दगडाचे मार्ग आणि झिपलाइनसोबत आणखी अनेक सुंदर गोष्टी आहेत.

पेरेस्टीमधील या ठिकाणी रोमानियन पंरपरा अद्याप जिवंत आहेत. येथील लाकडी दरवाजांमागे कहाण्या दडलेल्या आहेत. पारंपरिक घरांचा एक अनोख समूह स्वत:हून व्यक्त करण्याची प्रतीक्षा करत असल्याचे कंपनीकडून म्हटले गेले आहे.

हे गाव सुमारे 2400 चौरस मीटरच्या क्षेत्रात वसलेले आहे. यात घर, स्टर्जन, कार्प, ट्राउटयुक्त तलवा, स्टोन स्टोरेज, लाकडी मंडप, सौना हॉट टब आणि बार्बीक्यू झोन देखील आहे. येथे ट्री हाउस आणि जिपलाइन देखील आहे. जर कुणी नैसर्गिक सौंदर्याचा शौकी असेल तर त्याच्यासाठी ही उत्तम ऑफर आहे. सोथबीमध्ये या गावाला केवळ 6 कोटी 62 लाख 69 हजार 373 रुपयांमध्sय विकले जात आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article